Jalgaon News: खानदेशात खरिपातील पिकांच्या लागवडीत तूर लागवड यंदा काहीशी वाढली आहे, मात्र दर कमी मिळाले. हाती पैसा कमी आला असून, नफा मागील हंगामाच्या तुलनेत घटला आहे.
खानदेशात १५ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली होती. तुरीचे दर मागील वेळेस किंवा २०२३-२४ च्या हंगामात नऊ ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते. बाजारात दर बऱ्यापैकी राहिल्याने शासकीय केंद्रात तूर विक्रीची वेळ आली नाही. शिवाय दुष्काळी स्थितीतही तूर पिकाने अनेकांना तारले.
तुलनेत कापूस पीक परवडले नाही. कमी खर्च व कमी पावसात येणारे पीक म्हणून खानदेशात तूर लागवड २०२४-२५ च्या हंगामात वाढली. लागवड १५ हजार हेक्टरपुढे झाली. लागवड पूर्वहंगामी व कोरडवाहू क्षेत्रातही झाली. मागील वेळेस सुमारे आठ हजार हेक्टरवर तूर पीक खानदेशात होते.
यात कमाल शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली होती. यंदा तुरीची स्वतंत्र लागवड जळगावमधील मुक्ताईनगर, रावेर, यावल, जामनेर, चोपडा, जळगाव भागांत झाली. काहींनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली. तूर पीक लहान असताना सोयाबीनची चांगली वाढ होते व सोयाबीनची मळणी झाल्यानंतर तूर जोम धरते.
यामुळे पट्टा पद्धतीने तूर लागवडही खानदेशात बऱ्यापैकी झाली होती. तुरीची लागवड वाढल्याने दर्जेदार बियाण्यांची मागणीदेखील होती. काही वाणांचा तुटवडा होता. अनेक शेतकरी घरातील पारंपरिक, देशी वाणांची लागवड करीत होते. रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर भागांत शेतकऱ्यांनी जूनच्या सुरवातीलाच पूर्वहंगामी तुरीची लागवड केली.
तूर मळणी जानेवारीत सुरू झाली. त्यात उत्पादन बऱ्यापैकी आले. काहींना कोरडवाहू तुरीचे एकरी तीन ते चार क्विंटल व यापेक्षा अधिकही उत्पादन आले. पूर्वहंगामी तुरीचे उत्पादन एकरी आठ ते १० क्विंटल आले. परंतु दर कमी राहिले. यंदा फेब्रुवारी व मार्चच्या मध्यापर्यंत तुरीचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपये असे विविध बाजारांत मिळाले. यात नफा कमी आला व शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. एकरी २५ ते ३५ हजार रुपये एवढाच नफा काही शेतकऱ्यांना मिळाला.
तूर लागवडीत जळगावची आघाडी
जळगाव जिल्ह्यात ११ हजार ६०० हेक्टरवर तूर लागवड झाली होती. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर तूर पीक होते. रावेर भागात लागवड अधिक असते. तिन्ही जिल्ह्यांत तूर लागवड वाढली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.