Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विम्याच्या रकमेपासून शेतकरी अद्याप वंचित

Crop Insurance Compensation : सरकारकडून पंचनामा करण्यात आल्‍याने फळपीक विमा मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्‍याने ते हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : रोहा तालुक्यातील निडीतर्फे अष्टमी, दापोली व घोसाळे विभागातील फळपीक बागायतदार अद्याप विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे हजारो हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाले होते. या वेळी सरकारकडून पंचनामा करण्यात आल्‍याने फळपीक विमा मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्‍याने ते हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील घोसाळे मंडळात एकूण लाभार्थी १५२ असून निडीतर्फे अष्टमीत ४१, (दापोली), चणेरामध्ये २२ लाभार्थी अद्याप वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांची रोजीरोटी फळबाग तसेच आंबा पिकांवर अवलंबून आहे, त्‍यांची आर्थिक ओढाताण होत आहे.

सरकारकडून जिल्ह्यातील बहुतांश बागायतदारांना पीक विम्याची भरपाई मिळाली आहे, मात्र रोहा तालुक्यातील काही शेतकरी अद्याप प्रतीक्षेत असून लवकरात लवकर भरपाईची रक्‍कम मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

निडीतर्फे अष्टमी, घोसाळे, दापोली (चणेरा) या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप विम्याची रक्कम जमा केलेली नाही. ही रक्कम दोन दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होणार असल्‍याचे वरिष्‍ठांकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.
महादेव करे, कृषी अधिकारी, रोहा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT