Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : नव्या ऊस लागणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी

Sugarcane Farming : पाटबंधारे खात्याने काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे नियोजन केले असल्याने शेतकऱ्यांनी नव्याने ऊसलागण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : शेतकरी संघटनांच्या ऊसदराच्या आंदोलनांमुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला महिनाभर उशीर झाला. त्यामुळे नव्याने ऊसलागण हंगाम तब्बल महिनाभराने लांबला. पाटबंधारे खात्याने काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे नियोजन केले असल्याने शेतकऱ्यांनी नव्याने ऊसलागण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी केला जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणीटंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागणीकडे कल कमी दिसत आहे.

भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यात ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा ऊसदर आंदोलनामुळे साखर कारखाने महिनाभर उशिराने सुरू झाले. गळीत हंगाम तब्बल महिनाभराने पुढे ढकलल्याने रब्बी हंगाम उशिराने सुरू झाला. ऊस पिकाची लागण खरीप हंगाम संपल्यानंतर लगेचच १५ नोव्हेंबरनंतर सुरू होणे आवश्यक असते;

पण अवकाळी पाऊस, शेतकरी संघटनांचे ऊसदर आंदोलन यामुळे रब्बी हंगाम उशिरा सुरू झाला. त्यामुळे नदीकाठचे ऊसपीक पूरबाधित झाल्याने उत्पादन घटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यासाठी हंगाम वेळेवर सुरू होणे गरजेचे आहे.

काळाम्मावाडी धरणाला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गळती काढण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात उसाची लागण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही पुढील धोका ओळखून नवीन ऊस लागणी कमी केल्या आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस लागण क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

यंदा उशिराने सुरू झालेला गळीत हंगाम, पाटबंधारे विभागाने नव्याने ऊस लागण न करण्याचे केलेले आवाहन यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागणी कमी केल्या आहेत. याचा विचार करता पुढील ऊस हंगामामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होणार हे निश्चित.
दामाजी रामाणे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT