Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Farmer Award : कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांनी शेतकऱ्यांचा गौरव

Honor of farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा शेतकरी या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

Team Agrowon

Akola News : शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांची राज्य शासनाने दखल घेतली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा शेतकरी या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

शासनाने नुकतीच पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभागाने या शेतकऱ्यांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले होते. यात देविदास विश्‍वनाथ धोत्रे (रा. विवरा, ता. पातूर) यांना सन २०२० वर्षासाठी कृषिभूषण (सेंद्रिय शेती) म्हणून निवडण्यात आले आहे.

सचिन गजाननराव कोरडे (रा. हिंगणी, ता. तेल्हारा) यांना २०२० च्या उद्यानपंडित पुरस्कारासाठी निवडले गेले. तर अमोल बळिराम नेमाडे (रा. रायखेड, ता. तेल्हारा) यांना सन २०२० साठी वसंतराव नाईक शेतिनिष्ठ, दिलीप गुलाबराव ठाकरे (रा. मालवाडा, ता. बाळापूर) यांना सन २०२१ साठी शेतिनिष्ठ शेतकरी तर राजेश विठ्ठल चोपडे (रा. माटोडा, ता. मूर्तिजापूर) यांची सन २०२२ सालाच्या वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

ज्ञानेश्‍वर शेषराव ढोरे (रा. महागाव, ता. बार्शीटाकळी) यांची सन २०२२ वर्षात युवा शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी कर्मचारी गटात मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले विलास चव्हाण यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सेवारत्न पुरस्कार २०२२ मिळाला. या शेतकऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

शेतीक्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फलोत्पादन, सेंद्रिय शेती, अन्न प्रक्रिया, विक्री व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आपला या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी ठसा उमटवला आहे. शासनाच्या पुरस्कारामुळे निश्‍चितच या शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली असून पुढील काळात आणखी ठोस कामासाठी त्यांना दिशादर्शक प्रेरणा मिळेल.
शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT