Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल

Rain Update : तुरोरीसह परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Turori News : तुरोरीसह परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऐन पिके भरात असताना पाऊस गायब झाल्याने दुपारी पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या साह्याने पिकांना पाणी देण्यास सुरवात केली आहे.

यंदा सुरवातीलाच जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मृग नक्षत्रात पेरणी करण्यात आली. पेरणी झाल्यानंतर अधूनमधून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने व ता. २१ एप्रिल ते ता. २४ एप्रिलदरम्यान भिजपाऊस पडल्याने सोयाबीनसह तूर, मूग, तीळ, कारळे, उडीद आदी खरिपाची पिके रानावर बहरून गेली आहेत.

पावसाबरोबरच आंतरमशागतीची कामेही वेळेवर झाल्याने शेतात पिके डोलू लागली आहेत. अशातच सध्या पिके फुलोऱ्यात आली असतानाच पावसाने मात्र उघडीप दिली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी पिके काही ठिकाणी माना टाकू लागली आहेत.

पाऊस नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने चार दिवसांपासून सोयाबीनसह इतर पिकांना पाणी देत आहेत. खरिपातील पिकांना दररोज पावसाची गरज असते. पिके फुलोऱ्यात असताना पावसाने दडी मारल्याने उत्पन्नात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पावसाची प्रतीक्षा

या भागातील दगड धानोरा साठवण तलाव पावसाळ्याच्या सुरवातीला ओसंडून वाहात आहे. मात्र, अद्यापही तुरोरी मध्यम प्रकल्प व कोळसूर लघू प्रकल्प भरले नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकरीवर्गाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. येणाऱ्या काळात मोठा पाऊस झाला, तरच दोन्ही प्रकल्प भरणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT