Sericulture Agrowon
ॲग्रो विशेष

Reshim Sheti : रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना मिळतेय चांगले उत्पन्न

Sericulture Farming : ‘‘शेतीपूरक व्यवसाय असलेल्या रेशीम उद्योगामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : ‘‘शेतीपूरक व्यवसाय असलेल्या रेशीम उद्योगामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. इतर पिकांच्या तुलनेत हे एक शाश्वत उत्पन्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेती का करायची याचा विचार आवर्जून केला पाहिजे,’’ असे मत प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यात ‘महारेशीम अभियान २०२४’ राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. २४) इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथे शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय रेशीम शेती माहितीचे आणि नवीन शेतकरी नाव नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रेशीम विकास अधिकारी संजय फुले, मंडळ कृषी अधिकारी सतीश महानवर, बाजार समितीचे संचालक दशरथ पोळ, नीरा-भीमाचे संचालक दत्तात्रेय पोळ, कृषी सहाय्यक चंद्रकांत भुजबळ, उपसरपंच वैभव जाधव, संतोष पोळ आदी उपस्थित होते.

केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ हुमायून शरीफ म्हणाले, ‘‘दर पडल्यास शेतकरी टोमॅटो फेकून देतात. परंतु कोशाचे दर पडले तरी शेतकरी कोष रस्त्यावर फेकून देत नाहीत. कोशाचे काहीतरी पैसे त्याला मिळतातच. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याची गरज आहे.’’

फुले म्हणाले,‘‘कीटकसंगोपन संपल्यावर कीटकांनी तुती पाला खाऊन शिल्लक राहिलेल्या तुती काड्या दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून दिल्यास दुधाचे प्रमाण वाढते. तसेच स्निग्धांश टक्केवारीत वाढ होते.

याशिवाय रेशीम अळीच्या लेंडीचा उपयोग गोबर गॅसमध्येही होत आहे. जिल्ह्यात वार्षिक एकरी तीन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घेणारे असंख्य रेशीम शेतकरी आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT