Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्याचे ८ लाखांचे चेक बाऊन्स; शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ

Cheque Bounce : वैजापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका व्यापाऱ्याने दिलेले धनादेश न वटल्याने कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २२) दुपारी ४ वाजता गोंधळ घातला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी (दि. २२) दुपारी ४ वाजता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. तर हा गोंधळ शेतकऱ्यांनी एका व्यापाऱ्याने दिलेले धनादेश (चेक) न वटल्याने घातला होता. यामुळे संबंधित कांदा व्यापाऱ्यावर ८ लाख रूपये रोख रुपये शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीही वैजापूर शहराजवळ नागपूर- मुंबई महामार्गावर आहे. येथील कांदा मार्केटमध्ये जय सद्‌गुरू ट्रेडिंग कंपनी असून विलास रोहोम नामक अडत व्यापारी आहेत. रोहोम यांनी सोमवारी (ता.१८) १५ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. तसेच या १५ जनांना धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत जमा केल्यावर वटलेच नाहीत. यातून हा गोंधळ निर्माण झाला.

शेतकऱ्यांची बाजार समितीकडे धाव

कांदा विक्री पोटी मिळालेले धनादेश न वटल्याने १५ शेतकरी गोंधळात पडले होते. यामुळे या शेतकऱ्यांना शुक्रवारी बाजार समितीकडे धाव घेत याबाबत तक्रारी केल्या. तसेच सद्‌गुरू ट्रेडिंग कंपनीचे मालक विलास रोहोम यांच्याविरोधात पवित्रा घेत गोंधळ घातला. यामुळे रोहोम यांनी कंपनीतील कर्मचाऱ्याकडून रोख रक्कम पाठवून शेतकऱ्यांचे पैसे अदा केले. यानंतर शुक्रवारी निर्माण झालेल्या गोंधळासह वादावर पडदा टाकण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार

अडत व्यापाऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियकांना गेल्या काही दिवसांपासून केराची टोपली दाखवण्याचे काम सुरू आहे. येथे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ज्या त्या दिवसांच्या तारखांचे धनादेश द्यावेत, अशा सूचना समितीच्या आहेत. मात्र व्यापारी मनमानी कारभार करत असून ते आपल्या मर्जी प्रमाणे धनादेशावर तारखा टाकत आहेत.

यामुळेच सध्या धनादेश वटत नसल्याच्या अनेक तक्रारी बाजार समितीत येत आहेत. यावरून समितीने अडत व्यापाऱ्यांचे कान देखील टोचले होते. मात्र शुक्रवारी समोर आलेल्या गोंधळानंतर येथे व्यापाऱ्यांचे काम हे 'येरे माझ्या मागल्या' प्रमाणेच असल्याचे समोर आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT