Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : मोताळा तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी, शेतमजूर दहशतीत

Leopard : बुलडाणा तालुक्यातील अनेक भागांत वन्यप्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. वन क्षेत्राला लागून असलेल्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर असून पिकांसह शेतकऱ्यांच्या पशुधनाला धोका निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Motala News : मोताळा, जि. बुलडाणा : तालुक्यातील अनेक भागांत वन्यप्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. वन क्षेत्राला लागून असलेल्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर असून पिकांसह शेतकऱ्यांच्या पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. रोही, हरिण, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकऱ्यांना रात्रीही शेतात थांबून जागल करावी लागत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सध्या रब्बीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचा मुक्तसंचार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वी रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला होता. चावर्दा शिवारात एका शेतकऱ्याला बिबट्यासह दोन शावक मुक्तसंचार करताना दिसून आले होते. त्यापूर्वी नळकुंड, उबाळखेड, नाईकनगर व रोहिणखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकरी जखमी झाले होते.

तालुक्यातील आडविहीर येथील शेतकरी संतोष शंकर जंगले यांची वरुड शिवारातील पशुधनाच्या गोठ्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार तर, दोन जखमी झाल्याची घटना वरुड शिवारात उघडकीस आली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तालुक्यातील किन्होळा येथील शेतकरी भास्कर पंढरी गवई यांची पोखरी शिवारात बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करुन १० शेळ्या ठार केल्या. यामुळे भास्कर गवई यांचे लाखांवर नुकसान झाले.
शेतकरी, शेतमजुरांवरच्या हल्ल्यात वाढ रानडुकराच्या हल्ल्यात ४७ वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना कोथळीनजीक पलढग शिवारात घडली.

तालुक्यातील कोथळी येथील शेतमजूर हमीद खान समशेर खान (वय ४७) शेतात गहू पिकाला पाणी देत होते. दरम्यान, मकाच्या पिकात दबा धरून बसलेल्या पाच ते सहा रानडुकरांनी अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. तर चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील अश्विनी विनोद सावळे (वय ३२) या शेतात तूर काढणी करताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT