Cotton Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : कापूस-सोयाबीन उत्पादकांनी त्वरित कागदपत्रे द्यावीत ; कृषी विभागाचे आवाहन

Agriculture Department : सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसाहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादित देण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : कृषी विभागाच्या सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसाहाय्य योजनेंतर्गत अर्थसाहाय्य निधी अप्राप्त असलेल्या खातेदारांनी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसाहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादित देण्यात येत आहे.

यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पीक पाहणी केलेले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई. पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे खरीप २०२३ कापूस सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत.

अशा पात्र शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असलेबाबत खातरजमा www.scagridbt.mahalt.org या पोर्टलवर किया संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडून करुन घ्यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई - पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही.

तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे. अशा शेतक-यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT