PM Kusum Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump Scheme : सौर कृषिपंप योजनेसाठी आर्थिक मागणीस बळी पडू नये

Agriculture Solar Pump : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान कुसुम बी या योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात सौर कृषिपंप देण्यात येत असून, या योजनेचे फॉर्म भरणे वा कोणत्याही कामासाठी महावितरणने प्रतिनिधीची नियुक्ती केली नसून, योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या आमिषापोटी कुणीही आर्थिक मागणी केल्यास त्यास बळी न पडता सौरपंपाची रक्कम भरण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा.

तक्रार किंवा शंका असल्यास महावितरणच्या स्थानिक उपविभागीय कार्यालयात संपर्क व तक्रार करावी आणि ग्राहकांनी दक्ष राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान कुसुम बी या योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/ या लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा तसेच सौरपंपाची रक्कम भरण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा.

सौरपंपाची उभारणी करण्याकरिता किंवा किरकोळ साहित्य जसे, सिमेंट, खडी, वाळू, खड्डे खणणे आदीकरिता कोणी मागणी केल्यास महावितरणच्या जवळच्या उपविभागीय कार्यालयात तक्रारीसाठी संपर्क करावा. अर्जदारास त्यांनी निवडलेली संबंधित एजन्सी विना मोबदला सौर पंप उभारणी करून देईल.

वीजग्राहकांनी महावितरण कार्यालयांशी संपर्क साधावा

महावितरण कंपनीकडून ग्राहकाला ओटीपीची (OTP) मागणी फोनद्वारे करत नाही. त्यामुळे जर कोणी ओटीपीची मागणी करत असल्यास तो त्यांना देऊ नये व याबाबत उपविभागीय कार्यालयात तक्रार द्यावी.

सौरपंप उभारणीचे काम योग्यरीत्या होत असल्याची माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कक्ष अधिकारी व संबंधित वायरमन, जनमित्र यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. कुठल्याही योजनेसंदर्भात माहितीसाठी व तक्रारीसाठी वीजग्राहकांनी नजीकच्या महावितरण कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT