Union Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी महिलांसाठी विशेष तरतुदीची शक्यता

Women Budget 2024 : येणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात महिला, गरीब, तरुण, शेतकरी आणि आदिवासी यांना डोल्यासमोर ठेवून चांगले निर्णय घेण्यात येतील अशी चर्चा रंगली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाची चर्चा होत आहे. तसेच त्यांच्या या अर्थसंकल्पात समाजातील पाच प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आखण्यात येतील असेही म्हटलं जात आहे. ज्यात महिला, गरीब, तरुण, शेतकरी आणि आदिवासी घटकांच्या योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे या अर्थसंकल्पात शेतकरी महिलांसाठी मोठ्या घोषणा असतील असे बोलले जात आहे. तसेच यात खास तरतुदींचा विचार करण्यात आला आहे.

महिलांना मिळणारी दुप्पट रक्कम

देशात सध्याच्या घडीला सुमारे ११ कोटी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वितरित करण्यात येते. ज्यात पुरुषांप्रमाणेच शेतकरी महिलांचाही समावेशाची शक्यता आहे.

पण आता योजनेत सहभागी असणाऱ्या शेतकरी महिलांना पीएम किसान सन्मान निधीच्या दुप्पट पैसा दिले जातील अशी तरतूद केल्याचे म्हटलं जात आहे. सध्या वर्षाकाठी ६ हजार दिले जातात. पण आता महिलांना या योजनेअंतर्गत १२ हजार रुपये दिले जावेत असा विचार सरकारकडून केला जात आहे. जर ही निर्णय झाला तर शेतकरी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीला चालना मिळणार आहे.

रोख रक्कम देऊन

ज्या महिलांना सरकारी योजनेचा लाभ कोणताही लाभ मिळत नाही. त्यांचाही यावेळी विचार केला जाणार आहे. या महिलांना थेट रोख रक्कम सरकार देणार आहे. ज्यामुळे अशा महिलांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यास मोठा हातभार लागणार आहे.

सरकारचा प्रयत्न

फक्त पीएम किसान योजना किंवा थेट लाभ अशातून महिलांना सकक्ष करण्यासह मनरेगा योजनेतून देखील महिलांना सक्षम करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ५९.२६ % महिला कामगार म्हणून काम करतात.

कोणते होतील महिलांना फायदे!

१) विविध योजनेतंर्गत महिलांना आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्यांच्यावरचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.

२) पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेत दुप्प्ट वाढ करण्याचा सध्या सरकारचा विचार आहे. तसे झाल्यास महिलांचाही शेतीत सहभाग वाढेल.

३) पीएम किसान सन्मान निधी योजना, थेट रोख रक्कम आणि मनरेगा योजनेतून महिलांच्या उत्पादकतेत वाढ होईल.

४) विविध योजनांच्या आर्थिक मदतीमुळे महिलांच्या उत्पादकतेत वाढ होऊन त्यांना अधिक बळकटी मिळेल.

५) शेतकरी महिलांसाठी अर्थसंकल्पातच खास तरतूद केल्यास त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture University : कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ वाऱ्यावर

Kharif Sowing : खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT