Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

Rice Sowing : काही दिवसांपूर्वी खाऱ्या जमिनीत भातशेतीच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली. आता गोड्या जमिनीतील पेरणीलाही मंगळवारी (ता. १३) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Rain News : उरण : काही दिवसांपूर्वी खाऱ्या जमिनीत भातशेतीच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली. आता गोड्या जमिनीतील पेरणीलाही मंगळवारी (ता. १३) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सुरुवात झाली आहे.

दरम्यान, खाडीपट्ट्यातील भातपेरणी आधीच झाल्याने पशू-पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी पेरलेल्या बियाण्यांवर चक्क साड्यांचे संरक्षण दिले आहे. शेतजमीनीवर अनेक ठिकाणी रंगबेरंगी साड्या अंथरल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

उरण तालुक्यात प्रमुख पीक भाताचे घेतले जाते. त्यात खाडी आणि गोड्या जमिनीत भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवसआधी खाड्या जमिनीत भाताची पेरणी केली जाते. पावसाळा सुरू झाल्यानंतर गोड्या जमिनीत भाताची पेरणी केली जाते. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली.

मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने गोड्या जमिनीतील पेरणीला सुरुवात झाली आहे. खाऱ्या जमिनीत भाताची पेरणी यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, पेरलेले बियाणे जंगली कबूतर आणि पशू-पक्षी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने नवघर भेंडखळ पट्ट्यातील शेतकऱ्यांनी बियाणे वाचवण्यासाठी चक्क लुगडी, साड्यांनी झाकून ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अगोदरच भातशेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.

शेतीसाठी मजुरांची कमतरता आणि महाग झालेली मजुरी, खते आणि बियाणे यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ही नामी शक्कल लढवली आहे.

संपादित केलेल्या ओसाड जमिनीवर शेती

महालण विभागातील सगळी शेती सिडकोने संपादित केली आहे. तरी देखिल शेतीचे महत्त्व लक्षात घेता सिडकोच्या आणि एनएमएसईझेडच्या ओसाड जागेत या भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपली शेती सुरू केली आहे. सिडकोने संपादित केलेली ही जमीन काही वर्षांपासून ओसाड होती. झाडाझुडपांनी भरून गेली होती.

नवघरजवळील एनएमएसईझेड, भेंडखळजवळील एनएमएसईझेड, जसखार, पागोटे, धुतूम आदी ठिकाणी ही शेती केली जाते. त्यामुळे काही वर्षांपासून वापराविना पडून असलेली ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT