Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop : अपेक्षाभंग झाल्याने उखडून टाकली कपाशी

Cotton Rate : अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीचे उभे पीक उखडून टाकत जमिनीची मशागत करून रब्बी हंगामात गहू, हरभरा पेरणीची लगबग सुरू केली आहे.

Team Agrowon

Jalna News : अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीचे उभे पीक उखडून टाकत जमिनीची मशागत करून रब्बी हंगामात गहू, हरभरा पेरणीची लगबग सुरू केली आहे.

नगदी पीक व पांढरं सोनं म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कपाशीची लागवड केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याने एक-दोन वेचण्या करून शेतकऱ्यांनी उभे कपाशीचे पीक मोडून टाकले.

आता ट्रॅक्टरने शेतीची मशागत करत गहू व हरभरा पेरणीची लगबग सुरू केली आहे. सततचा दुष्काळ, बेमोसमी पाऊस, रोगराई, नैसर्गिक आपत्तीचे संकट पाठीशी लागल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेला खर्चही वसूल झाला नाही.

यामुळे सध्या मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात उत्पन्नाची आशेने शेतकरी गहू, हरभरा या पिकांची लागवड करीत आहेत.

मोठ्या उत्पन्नाच्या आशेने कपाशीची लागवड केली. महागामोलाचे खत, औषधी, वेचणीचा व वाहतूक खर्च केला. मात्र, उत्पन्नाचा ताळमेळ बसला नाही. त्यातच शासनाकडून शासकीय खरेदी केंद्रे व हमीभाव मिळत नसल्याने कपाशीच्या पिकातून उत्पन्नाची आशा पुरती मावळल्याने कपाशीचे उभे पीक उखडून टाकले.
- संदीपान मुंजाळ, शेतकरी मार्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT