Farmer In Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Death : दोन महिन्यांत अमरावती जिल्ह्यात ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Agriculture Crisis : गत हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे झालेले नुकसान व हाती आलेल्या पिकांना हमीदरापेक्षाही कमी दर मिळाल्याने शेतकरी आर्थिक विपन्नावस्थेत गेला आहे.

Team Agrowon

Amaravati News : खरीप हंगामाच्या तोंडावर गेल्या दोन महिन्यांत ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील बहुतांश आत्महत्या कर्जाचा डोंगर व आर्थिक चणचणीतून झाल्याचे सांगण्यात येत असून जिल्हा प्रशासनाकडून अद्याप या दोन्ही महिन्यांतील प्रकरणांत चौकशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

जून महिन्यात खरीप हंगामाची सुरुवात झाली असून पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करून तयारी करण्यात शेतकरी व्यग्र होते. गत हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे झालेले नुकसान व हाती आलेल्या पिकांना हमीदरापेक्षाही कमी दर मिळाल्याने शेतकरी आर्थिक विपन्नावस्थेत गेला आहे.

आगामी हंगामासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करताना झालेली दमछाक व बॅंकांसह सावकारांकडून मिळालेला नकार, यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एप्रिल महिन्यात १७ व मे महिन्यात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून एप्रिल व मे महिन्यात हा आलेख मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत उघड झाले आहे.

तथापि एप्रिल व मे महिन्यातील आत्महत्यांच्या प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असल्याने कर्जापायी आत्महत्या किती आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. तथापि जानेवारीत पाच, फेब्रुवारीत दोन व मार्च महिन्यात दोन, अशा नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत.

जानेवारी ते मे या पाच महिन्यांतील ८३ पैकी ७० प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. प्रकरणे प्रलंबित ठेवून जिल्हा प्रशासन वास्तव उघड होणार नाही व केवळ कर्जापायी आत्महत्या झाल्यात, हे लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

चार कुटुंबांना मदत

पाच महिन्यांत झालेल्या ८३ पैकी केवळ चार कुटुंबांना शासकीय निकषाप्रमाणे मदत देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात पाच तर फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी दोन प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. पाच प्रकरणांत अद्यापही मदत देण्यात आलेली नाही.

जानेवारी ते मे महिन्यातील स्थिती (पात्र)

जानेवारी ः १३ (५),फेब्रुवारी ः १० (२) , मार्च ः १८ (२), एप्रिल ः १७ (०),

मे ः २५ (०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT