Government Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation Scheme : जलसंधारण योजनांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा निर्धार

Government Scheme : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने देखील जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशा योजना राबविण्यात येतात.

Team Agrowon

U=Yavatmal News : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने देखील जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशा योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

येथील समता मैदानात आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्‍घाटन संजय राठोड यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ६) झाले, त्या वेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अंजली गहरवाल, सहयोगी संशोधन संचालक आशुतोष लाटकर, जीवन पाटील, पराग पिंगळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ मयूर ढोले, एमएआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. नंदकिशोर हिरवे, उपसंचालक तेजस चव्हाण उपस्थित होते.

हा महोत्सव सोमवारपर्यंत (ता. १०) सुरू राहणार आहे. सुरुवातीस श्री. राठोड यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या दालनांचे फित कापून उद्‍घाटन केले. त्यानंतर विविध दालनांना भेटी देऊन पाहणी केली.

‘मी देखील शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहतांना मला आनंद होतो. येत्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारामती येथे ज्या पद्धतीने कृषी प्रदर्शन भरविण्यात येते, तसे प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न आहे,’ असे राठोड यांनी सांगितले. मृद व जनसंधारण विभाग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

जिल्ह्यातील ६०० हेक्टरच्या खालील सर्व तलावांमधून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कालव्यांऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा नवीन प्रयोग जिल्ह्यात राबवत आहोत. शेतकऱ्यांना दिवसादेखील सिंचनासाठी वीज उपलब्ध होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डाबरे यांनी केले. राठोड यांच्या हस्ते प्रयोगशील शेतकरी महेश्वर बिचेवार, विठ्ठल मालेकर, दीपक जयस्वाल, रमेश वाटगुरे, अंकुश लेंडे, चंदाबाई घोडाम, गोपाळ बोबडे, एन. टी. जाधव, राजेश गुज्जलवार, रवींद्र वैद्य, ज्योती चव्हाण, संदीप म्हस्के, उल्हास गायकवाड, विलास रावते, महादेव चिडे, सुधाकर तोटावार, विनाताई कुडमेथे यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT