Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सात फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा ; शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांचे विमा कंपनीला स्मरणपत्र

Crop Insurance Scheme : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार २०२३ या वर्षीचा पीकविमा व २०२४ खरीप हंगामातील २५ टक्के अग्रिम रक्कम सात फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना द्यावी, असे स्मरणपत्र शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी कंपनीच्या अधिकऱ्यांना दिले.

Team Agrowon

नांदेड : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार २०२३ या वर्षीचा पीकविमा व २०२४ खरीप हंगामातील २५ टक्के अग्रिम रक्कम सात फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना द्यावी, असे स्मरणपत्र शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी कंपनीच्या अधिकऱ्यांना दिले.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात २३ डिसेंबर रोजी पीकविम्यासाठी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन आंदोलन पुकारले होते. कंपनीच्या नांदेड येथील कार्यालयात दिवसभर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. कृषी विभागाने परिपूर्ण माहिती दिली नाही, अशी टोलवा-टोलवी या कंपनीच्या वतीने करण्यात येत होती.

त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत हेही दिवसभर आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवून कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आमदार हेमंत पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.

जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा प्रश्न असल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दीड महिन्याचा कालावधी मागून घेतला होता. या दीड महिन्यात शेतकऱ्यांना विमा रक्कम देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते.
कंपनीने दिलेल्या वेळेत शेतकऱ्यांना विमा दिला नाही तर लोकप्रतिनिधीही या आंदोलनात सक्रिय सहभागी होतील, असा इशारा आमदारांनी दिला होता. त्यामुळे सर्वांच्या विनंतीवरून आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले होते.

त्यानंतर आता एक महिना उलटून गेला असून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक शोयब आलम यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची आठवण त्यांना करून देण्यात आली.
सात फेब्रुवारीपर्यंत २०२३ चा पीकविमा व २०२४ मधील खरीप हंगामाची २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे स्मरणपत्र दिले. या वेळी शेतकरी सेना जिल्हाप्रमुख माधव कदम, ज्ञानेश्वर आवर्दे, अरुण पोपळे, शिवराज गवळी, उमेश गवळी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT