Farmer ID  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : बुलडाण्यात २ लाख शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही

Agriculture Scheme Benefits : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) १५ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आला आहे.

Team Agrowon

Buldana News : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) १५ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच लाख ७२ हजार १२८ खातेदार आहेत. यापैकी अद्याप दोन लाख २१ हजारांवर खातेदारांनी हे कार्ड काढले नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी तीन लाख ५० हजार ३०७ शेतकऱ्यांनी आजवर नोंदणी केली आहे. एकूण खातेदारांच्या तुलनेत हे जवळपास ६२ टक्के खातेदार आहेत. मात्र, अद्यापही दोन लाख २१ हजारांवर खातेदारांनी नोंदणी केलेली नाही.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनवून कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.ज्यांनी हे कार्ड काढले नाही असे दोन लाख २१८२१ शेतकरी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कृषी सहायकाशी संपर्क साधून जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करीत शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा.

याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण निर्माण झाल्यास आपल्या तहसील किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. आपल्या नजीकचे सी.एस.सी.केंद्र शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी https://locator.csccloud.in लिंकचा वापर करावा व आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT