Agristack Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी बनवा

Agriculture Scheme : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी मंगळवारपासून (ता.१५) अनिवार्य करण्यात आले आहे.

Team Agrowon

Buldana News : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी मंगळवारपासून (ता.१५) अनिवार्य करण्यात आले आहे.

आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनवून कृषी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

फार्मर आयडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करणे सुलभ होईल.

तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकरी ओळख पत्र क्रमांक मंगळवार अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे शासन निर्णयही नुकताच जारी करण्यात आला आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी सातबारा आधारला लिंक करायचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ४७ हजार २१३ शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार करून वितरित करण्यात आले आहे.

आयडी बनवण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक जो आधार व बँक खात्याशी लिंक व सातबारा किंवा नमुना ८ या कागदपत्राची आवश्यक आहे. ही कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी), ग्राम कृषी विकास समिती येथे नोंदणी करावी. फार्मर आयडी बनवला नाही तर कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT