Farmer with Digital ID  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक

Agriculture Scheme : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्री स्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्री स्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. राज्यातील एकूण एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची यामध्ये नोंदणी होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेले सर्व शेतजमीन आपल्या आधारशी संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे.

या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामांसाठी होणार आहे. यासंदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

फार्मर आयडीचे फायदे

केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सहज लाभ

पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज

पिकांबाबत सल्ला

हवामानाबाबत माहिती व सल्ला

आपत्ती सल्ला आणि प्रतिसाद

बाजारभावाबाबत सल्ला

कीड आणि इतर रोगांबाबत सल्ला

कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला

मृदा आरोग्य माहिती

आवश्यक कागदपत्रे अन्‌ अर्ज कोठे करावे?

आधार कार्ड

स्वतःच्या नावावरील सर्व सात-बारा आणि आठ अ

मोबाईल

फार्मर आयडी बनवण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT