Farmer ID  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : बुलडाण्यात ३.९० लाख शेतकऱ्यांचे आयडी तयार

Agriculture Scheme Benefits : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) शासनाने १५ एप्रिलपासून अनिवार्य केला आहे.

Team Agrowon

Buldana News : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) शासनाने १५ एप्रिलपासून अनिवार्य केला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आजवर तीन लाख ९० हजारांवर शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार झाले, असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.

अद्यापही फार्मर आयडी न बनविलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा ग्राम कृषी विकास समितीकडे जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे चार लाख ३४ हजार ४६८ लाभार्थी आहेत. त्यापैकी दोन लाख ९९ हजार ९६८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी तयार केले.

आजवर एकूण तीन लाख ९० हजार १२३ शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात आले आहेत. यापुढे शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय कोणतीही कृषी योजना मिळणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकरी ओळख क्रमांकाचे महत्त्व

शेतकरी ओळख क्रमांकांतर्गत शेतकऱ्यांची आधाराशी लिंक केलेली माहिती एकत्र करून ‘फार्मर रजिस्ट्री’ तयार करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांची अचूक निवड करता येऊन योजनांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पोहोचवता येईल.

एकदाच प्रमाणीकरण

शेतकरी ओळख क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणीकरण करण्याची गरज भासणार नाही. मात्र सातबारा उतारा आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर

आधारशी लिंक असलेले बँक खाते

सातबारा उतारा किंवा नमुना ८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT