Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : पालीमध्ये शेतकरी कुटुंबे रमली भातकापणीत

Paddy Crop : पाली तालुकयात यंदा भातपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र अवेळी पावसामुळे भात पिकांचे आतोनात नुकसान झाले.

Team Agrowon

Pali News : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असला तरी हाताशी आलेले भात पीक कापणीच्या कामांची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागली आहेत.

यामध्ये सुशिक्षित तरुण देखील प्रकर्षाने दिसून येत आहेत. शिवाय यावेळी अनेक गमतीजमती, गाणी, जेवण आदींचा कार्यक्रमदेखील होत आहे. पाली तालुकयात यंदा भातपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र अवेळी पावसामुळे भात पिकांचे आतोनात नुकसान झाले.

त्‍यातच आता मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र यावर उपाय म्‍हणून आता कुटुंबातील तसेच शेजारी-पाजारी व्‍यक्‍तींना भात कापनीच्‍या कामात समावून घेतले जात आहे.

कुटुंबातील सदस्य भात शेतीची कामे करतात, त्यामुळे मजुरांचा खर्च वाचतो. शिवाय कामे देखील वेळेत होतात, असे सांगण्यात येत आहे. काही वेळेला नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी येत आहेत.

तसेच सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून आता शेतकामात शिकला- सवरलेला वर्ग दिसून येत आहे. जिल्ह्यातील भात शेती तुकड्यात विभागलेली आहे.

तर काही शेती डोंगर उतारावर आहे. परिणामी अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने म्हणजे विळ्याने भात कापून हाताने झोडणी करतात. भात कापणीला आता चांगलाच वेग आला आहे. ही कामे कुटुंबातील व्‍यक्‍ती गंमतीजमती करून करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT