Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Crop : परभणीत हजारो हेक्टरवरील हरभऱ्यावर फिरवली वखर

Chana Disease : मॉन्सूनोत्तर पावसामुळे हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पीक विरळ झाले आहे.

माणिक रासवे

Parbhnai News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पीक विरळ झाले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील हरभऱ्यावर हरभऱ्यावर वखर फिरवला आहे. सुरुवातीच्या पेरणीवर केलेला खर्च वाया गेला असून, दुबार पेरणीचा भुर्दंड बसला आहे.

खरिपातील सोयाबीननंतर रब्बीत हरभरा ही पीक पद्धती किफायतशीर ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत गेल्या काही वर्षांत हरभऱ्याचे क्षेत्रात वाढ झाली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. हरभरा पिकांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. अतिरिक्त पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव तसेच घाटे आळीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याचे पीक विरळ झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला पेरणी केलेले हरभऱ्याचे पीक मोडून टाकावे लागत आहे. वाघाळा (ता. पाथरी) येथील शेतकरी त्र्यंबक घुंबरे यांनी १० एकर हरभऱ्यावर वखर फिरविला.

यासह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांवर मर रोगामुळे हरभरा मोडून टाकण्याची वेळ आली आहे. हरभरा पीक बाधित झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्रिंबक घुंबरे, भागवत घुंबरे, सुनीता घुंबरे या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT