FPC  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Producer Company : शेतकरी कंपन्यांनी गावस्तरावर रोजगार निर्मितीचा प्रयत्न करावा

Employment Generation : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी काळानुरूप आपल्या कार्यपद्धतीत बदल घडविला पाहिजे. शेतमालावर प्रक्रिया, त्याचे ब्रॅण्डिंग यावर भर देण्याची गरज असल्याचे मत विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी व्यक्‍त केले.

Team Agrowon

Amravati News : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी काळानुरूप आपल्या कार्यपद्धतीत बदल घडविला पाहिजे. शेतमालावर प्रक्रिया, त्याचे ब्रॅण्डिंग यावर भर देण्याची गरज असल्याचे मत विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी व्यक्‍त केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषिभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन यांच्या संयुक्‍त सहकार्याने ॲग्री स्टार्टअप कन्व्हेशन २०२३ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, भूषण निकम, प्रा. जितेंद्र दुर्गे, प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले यांची उपस्थिती होती. किसन मुळे म्हणाले, ‘‘गावस्तरावर उद्योगाची उभारणी झाल्यास उत्पादीत शेतीमालावर गावातच प्रक्रिया होईल.

यातून रोजगाराचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना देखील गावातच शेतीमाल विक्रीचा उद्देश साधता येणार असल्याने वाहतूक व इतर बाबींवरचा खर्चही वाचेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्यावर भर देण्याची गरज आहे. प्रा. जितेंद्र दुर्गे, भूषण निकम यांनी मार्गदर्शन केले.

आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी प्रास्ताविक केले. आभार नीलेश राठोड यांनी मानले. प्रकल्प उपसंचालक डॉ. प्रीती सवाई राम, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी उज्ज्वल आगरकर, मिलिंद वानखडे तसेच शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, व्यवस्थापन, उद्योग-व्यवसायाची निवड, शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग, प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धती, मार्केट लिंकेजेस, मार्केटिंग व ब्रॅण्डिंग याविषी मार्गदर्शन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT