Agriculture Trade  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Trade : शेतकरी कंपन्यांचा शेतीमाल खरेदीत आणि निर्यात करण्यात मोठा वाटा

Agriculture Export : दिवसेंदिवस शेतकरी कंपन्यांचा शेतमाल खरेदीसह निर्यातीत मोठा वाटा तयार होत आहे, ही बाब अधिक महत्त्वाची आहे, असे मत आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Buldana News : दिवसेंदिवस शेतकरी कंपन्यांचा शेतमाल खरेदीसह निर्यातीत मोठा वाटा तयार होत आहे, ही बाब अधिक महत्त्वाची आहे, असे मत आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत शुक्रवारी (ता.१४) जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्रेता संमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन आत्मा संचालक दशरथ तांभाळे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. या वेळी सोहम काकडे यांनीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने निर्यातीबाबत मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. उन्हाळे बोलत होते.

या संमेलनात इरडे अॅग्रो, आयटीसी, एडीएम, ग्रीन अॅग्रो बाजार, गौरव एक्स्पोर्ट, ग्रीन गोल्ड, बुस्टर, वनपीक शेतकरी उत्पादक कंपनी, दत्तगुरु शेतकरी उत्पादक कंपनी, आभाळमया शेतकरी उत्पादक कंपनी, प्युअर ऑइल एक्स्पोर्ट, अभिता अॅग्रो लिमिटेड आदी कंपन्या खरेदीदार म्हणून सहभागी झाल्या होत्या.

वखार महामंडळाबाबत अमोल जाधव यांनी मार्गदर्शन केले. नाबार्डच्या योजनांबाबत जिल्हा व्यवस्थापक रोहित गाडे यांनी मार्गदर्शन केले. पोस्ट विभागाच्या काही निर्यात बाबत असलेल्या योजनांची माहिती श्री. कचरे यांनी दिली.

उद्योग केंद्राचे सुनील पाटील यांनी उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. ढगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी दीपक बुटे, बिपीन राठोड, अर्थतज्ज्ञ गणेश सुसर, सुनील शिंगणे, अमोल नलावडे, गजानन इंगळे, गजानन चौधरी यांनी पुढाकार घेतला.

कंपन्यांमध्ये झाले करार

विदर्भ समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी आणि दत्तगुरु शेतकरी उत्पादक कंपनी (हिंगोली) यांच्यात दीड कोटींचा करार करण्यात आला. ऋतुध्वज शेतकरी उत्पादक कंपनी आणि ग्रीन गोल्ड कंपनीमध्ये १० लाखांचा सोयाबीनचा करार झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT