Farm Road Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Issue : वाण्याचीवाडीतील शेती रस्त्याचा प्रश्न मार्गी

Agriculture News : वाण्याचीवाडी येथील सुमारे ३० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत जा- ये करण्यास व वाहतुकीस लागणारा वहिवाटीचा रस्ता काही कारणास्तव कित्येक वर्षे बंद होता.

Team Agrowon

Satara News : वाण्याचीवाडी येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा रस्ता प्रशासनाने नुकताच रिकामा केला. भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या प्रयत्नाने व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासकीय समितीच्या अध्यक्षा दीपाली खोत यांच्या पाठपुराव्यामुळे कायमस्वरूपाची गैरसोय दूर झाली. संबंधित शेतकऱ्यांनी श्री. वेताळ, दीपाली खोत यांना धन्यवाद दिले.

वाण्याचीवाडी येथील सुमारे ३० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत जा- ये करण्यास व वाहतुकीस लागणारा वहिवाटीचा रस्ता काही कारणास्तव कित्येक वर्षे बंद होता. त्याचा प्रस्ताव गावकऱ्यांनी दीपाली खोत यांच्यासमोर मांडला. त्यांनी संबंधित रस्त्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यास पुढाकार घेतला.

श्री. वेताळ यांच्या मार्गदर्शनाने शासकीय प्रक्रिया करून शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्यात आला. मंडलाधिकारी मेघा जाधव यांनी दीपाली खोत यांच्यासोबत पोलिस पाटील शशिकांत खोत यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली.

सर्वांच्या सहमतीने हा रस्ता मान्य करण्यात आला. अनेक वर्षे ऊस वाहतूक, कडबा वाहतूक अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते. शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. शेतकऱ्यांच्या चिंतेचा हा विषय निकालात निघाल्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत.

यावेळी गावकऱ्यांनी श्री. वेताळ, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार राठोड यांचे आभार मानले. पांडुरंग साळुंखे, जयेंद्र चव्हाण, लक्ष्मण साळुंखे, शंकर साळुंखे, मकबूल फकीर, रहिमशा फकीर, हसन फकीर, सदानंद चव्हाण, रामदास जाधव, शंकर जाधव, कासम फकीर, सय्याजी सुतार, पांडुरंग जाधव, राजाराम धस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT