Red Chili Market Agrowon
ॲग्रो विशेष

Red Chili Market : लाल मिरचीच्या दरात घसरण

Chili Rate : गतवर्षाच्या तुलनेत यंदा येथील बाजार समितीत लाल मिरचीचे दर प्रतिक्विंटल चार ते १० हजारांनी कमी झाले आहेत.

Team Agrowon

Solapur News : गतवर्षाच्या तुलनेत यंदा येथील बाजार समितीत लाल मिरचीचे दर प्रतिक्विंटल चार ते १० हजारांनी कमी झाले आहेत. बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने हैराण झालेल्या गृहिणींना लाल मिरचीने दिलासा दिला असला तरी मालाची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे.

उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. या काळात नवीन मिरची बाजारात येते. ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल इतके तिखट करून ठेवले जाते. मात्र, गतवर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी झाल्याने मिरची खरेदी केली जात आहे.

येथील बाजार समितीत राज्यातील धुळे, नंदुरबारसह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून मिरची येते. गतवर्षी सी फाइव्ह या संकरित मिरचीचा दर प्रतिक्विंटल १७ हजार ते २० हजार रुपये होता. तो यंदा ११ हजार ते १५ हजार रुपये आहे.

तर तेजाचा दर प्रतिक्विंटल २० हजार ते २२ हजार रुपये होता. तो यंदा १६ ते १९ हजार रुपयांवर आहे. तर ब्याडगी मिरचीच्या दरात एक हजार ते दीड हजारापर्यंत घसरण झाली आहे. गतवर्षी प्रतिक्विंटल ३० हजारांपुढे असलेला ब्याडगी यंदा १५ हजार ते २० हजार झाला आहे.

मिरची पावडरच्या दरात ५० ते ३०० रुपये घट

मिरची घेऊन तिखट बनविण्यापेक्षा अनेक महिला पावडर खरेदी करण्यास पसंती देतात. मात्र, त्याचे प्रमाण हे कमी आहे. सध्या बाजारात पावडर प्रतिकिलो १५० ते ३०० रुपये दराने विकली जात आहे. सी फाइव्ह पावडरचा प्रतिकिलो १५० ते २००, ब्याडगीचा ३०० रुपये भाव आहे. गतवर्षी ब्याडगीचा दर ५०० रुपये होता. तर साधा पावडरचा दर प्रतिकिलो २०० ते २४० रुपयांपर्यंत आहे.

दररोज पाच हजार पोती आवक

सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढल्याने दर पडले आहेत. राज्यातील धुळे, नंदुरबारसह कर्नाटक, आंध्रप्रदेशात उत्पादन वाढल्याने दररोज चार ते पाच हजार पोती लाल मिरचीची आवक होत आहे. यात सर्वाधिक सी फाइव्ह मिरचीला मागणी आहे. यात सी फाइव्हची सर्वाधिक तर त्या खालोखाल तेजाची आवक आहे. तर ब्याडगीची आवक कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT