Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांद्याची खेडा खरेदी घसरणीवर

Onion Rate : कांद्याच्या दरात या आठवड्यात खेडा खरेदीत ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली असून, उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Team Agrowon

Akola News : कांद्याच्या दरात या आठवड्यात खेडा खरेदीत ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली असून, उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आठवडाभरापूर्वी १३०० ते १४०० पर्यंत खेड्यांमध्ये कांद्याची खरेदी सुरू होती. आता हीच खरेदी ८०० पासून ११०० दरम्यान केली जात आहे.

सध्या या भागात कांदा काढणीला वेग आला आहे. या वर्षी मध्यंतरी झालेला पाऊस, ढगाळ वातावरण आणि गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले होते. यातून वाचलेल्या कांद्याची काढणी सुरू झाली आहे. शेतांमध्ये दिवसभर मजूर कांदा काढणी, कापणी तसेच ढीग लावण्याचे काम करताना दिसून येतात.

यासाठी एकरी १२ ते १५ हजारांचा थेट खर्च होत आहे. शिवाय यापुर्वीसुद्धा बी-बियाणे, व्यवस्थापन, लागवड, खते, किडनाशकांची फवारणी अशा विविध कामांसाठी २० हजारांवर खर्च झालेला आहे. एकूण खर्च ३५ ते ४० हजारांपर्यंत झाला आहे.

तर आता एकरी उत्पादन ५० क्विंटलपासून होत आहे. या कांद्याची मागणी व्यापारी ८०० रुपयांपासून करू लागले आहेत. अवघ्या सहा ते सात दिवसांत कांद्याचा दर ३०० ते ४०० रुपयांनी घसरला आहे.

पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकरी लगबगीने कांदा काढण्यासाठी सरसावलेले आहेत. अशातच दर कमी झाल्याने मिळेल त्या भावात विकण्याशिवाय दुसरा पर्यायसुद्धा शिल्लक राहलेला नाही.

या भागात कांदा साठवणुकीच्या सुविधा अत्यंत कमी असल्यानेही उत्पादकांना दुहेरी नुकसान झेलावे लागत आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी सुरुवातीला केलेले सौदे सोडून देत आहेत. ठरलेला दरही देत नसल्याने पेच तयार होऊ लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT