Agriculture Inputs Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fungicide : भुसावळमधील बनावट बुरशीनाशक कारखान्यावर कारवाई

भुसावळमधील वाल्मीक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५ टक्के WP या बुरशीनाशकाची (एम ४५) अनधिकृत निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभागाने कारवाई केली.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव भुसावळमधील वाल्मीक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५ टक्के WP या बुरशीनाशकाची (एम ४५) अनधिकृत निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभागाने कारवाई केली. बनावट बुरशीनाशके व अन्य साठा जप्त करण्यात आला आहे.

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५ टक्के WP या बुरशीनाशकाची (एम ४५) नावाने अधिकृत विक्री होत असते. या कंपनीचा लोगो, ब्रँड नेम, समान रंगसंगती असणारी पाकिटे तयार करून बनावट एम ४५ बुरशीनाशके तयार केली जात होती.

याची माहिती कृषी विभागाला मिळाली. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा परिषदेतील मोहीम अधिकारी विजय पवार यांनी याबाबत विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी चर्चा करून कारवाईचे नियोजन केले.

संशयित आरोपींच्या भुसावळ येथे वाल्मीक नगरातील कारखान्यावर पोलिस पथक व गुणनियंत्रण पथकातील सदस्यांनी छापा टाकला. त्यात विनापरवाना बुरशीनाशक उत्पादन, साठवणूक करत असल्याचे आढळून आले. बनावट एम ४५ बुरशीनाशकाची एक हजार १० पाकिटे, बुरशीनाशक तयार करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी वाल पुट्टीच्या बॅग, सिलिंग मशिन, बनावट पाकिटे आदी साहित्य आढळले.

त्याची किंमत एकूण तीन लाख ८७ हजार ३६० रुपये आहे. संशयित आरोपींना परवाना व उत्पादनाबाबतची कागदपत्रे व पुरवठादार यांच्याविषयी माहिती विचारली असता ते देऊ शकले नाहीत.  भुसावळातील बाजारपेठ पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT