Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer : कोल्हापुरात बनावट खत साठा जप्त

Fertilizer Stock : कृषी विभागाकडून कारवाई दरम्यान १ लाख २५ हजार रुपये किमतीची बनावट खते जप्त करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील खुपिरे (ता. करवीर) येथे कृषी विभागाने बनावट खत विक्री प्रकरणी रविवारी (ता. ९) कारवाई केली. रंकभैरवी या कृषी सेवा केंद्रात १०:२६:२६ (एनपीके) या रासायनिक खताच्या ७७ बॅग सापडल्या आहेत.

कृषी केंद्रचालक आकाश गणपती नाळे (रा. सांगरूळ) याच्यावर करवीर पोलिसांत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून कारवाई दरम्यान १ लाख २५ हजार रुपये किमतीची बनावट खते जप्त करण्यात आली आहेत.

या वेळी कृषी उपसंचालक एन. एस. परीट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. पोलिस आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुपिरे येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर आकाश नाळे याचे रंकभैरव नावाने कृषी सेवा केंद्र आहे.

या केंद्रामध्ये अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान पारादीप फॉस्फेट लिमिटेड या खताच्या बॅगमध्ये १०:२६:२६ ऐवजी दुसरे खत भरले असल्याचा संशय आला.

बॅग तपासणी करत असताना ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे लक्षात आले. १०:२६:२६ या खताच्या बॅगचा दर १७२० रुपये आहे. बॅगवर एमआरपी १६५० रुपये होती. यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी अधिकची चौकशी केली.

चौकशी दरम्यान बनावट व दुसऱ्याच कंपनीचे खत या बॅगमध्ये भरल्याचे अधिकाऱ्यांच्‍या निदर्शनास आले. केंद्र चालकाला जाब विचारला असता ८० बॅग आल्या होत्या. यातील तीन बॅग विकल्या असून ७७ बॅग स्टॉकमध्ये असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT