Shani Shinganapur Temple Agrowon
ॲग्रो विशेष

Shani Shingnapur Scam : बनावट अॅपद्वारे गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

Fake Donation App : जागतिक स्तरावरील देवस्थान म्हणून ओळख असलेल्या शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील शनैश्वर देवस्थानात बनावट अॅप करून देगणी स्वीकारत मोठा गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : जागतिक स्तरावरील देवस्थान म्हणून ओळख असलेल्या शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील शनैश्वर देवस्थानात बनावट अॅप करून देगणी स्वीकारत मोठा गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वस्त समितीने गरजेपेक्षा अधिक कर्मचारी दाखवून त्यातही गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. शिर्डी, पंढरपूर प्रमाणे येथे समिती स्थापन होणार आहे.

शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये देणगी स्वीकारण्यासाठी बनावट अॅप तयार करून देवस्थानच्या खात्याऐवजी वैयक्तिक खात्यावर रक्कम घेऊन गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याबाबत सायबर विभागाकडे तक्रारही दाखल आहे. अॅपमधून गैरव्यवहार करत पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करावी, या बाबत नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता. ११) प्रश्न उपस्थित करत लक्षवेधी सूचना मांडली.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले. देवस्थानातील गैरव्यवहाराबाबतच्या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमली होती. त्याचा अहवाल सादर झाला. ज्यावेळी २५८ कर्मचारी होते तेव्हा मंदिराचा कारभार नीट चालायचा. विश्वस्त मंडळाने गरज नसताना तब्बल दोन हजार ४४७ कर्मचाऱ्यांची भरती केली.

विश्वस्त मंडळाच्या रुग्णालयात केवळ चार डॉक्टर नऊ कर्मचारी हजर असताना त्या ठिकाणी दोनशे कर्मचारी, रुग्णालयात नसलेल्या बागेसाठी ८० कर्मचारी, भक्त निवासातील १०९ खोल्यांसाठी २०० कर्मचारी, देणगी स्वीकारण्यासाठी आठ, तेल विक्रीसाठी चार अशा १२ टेबलवर केवळ दोन कर्मचारी काम करत असताना तिथे ३५२ कर्मचारी, वाहनतळामध्ये देवस्थानच्या स्वतःच्या १३ गाड्यांसाठी १६३ कर्मचारी, शेती विभागातील ३५ एकर जमिनीच्या देखभालीसाठी ६५ कर्मचारी, गोशाळा विभागात ८२ कर्मचारी, विद्युत विभागात केवळ एका युनिटला २०० कर्मचारी दाखवले.

प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांची नोंदही नाही, हजेरी नाही, सही नाही. या बनावट कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत होता, असे विधानसभेत सांगण्यात आले. आता मंदिर विश्वस्त मंडळाने आर्थिक गैरव्यवहार केलेला असल्याने हे मंडळ बरखास्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

‘त्या’ अधिकाऱ्यांवरही कारवाई

शनी देवस्थानच्या गैरकारभाराबाबत धर्मादाय मधील एका अधिकाऱ्याने चौकशी करून क्लीनचिट दिली होती. मात्र त्या चौकशी समितीमधील अधिकाऱ्याने हा गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची केवळ बदली झाली. मात्र त्या अधिकाऱ्यावरही आता खातेनिहाय चौकशी करून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

Crop Insurance: पीक विम्यात आता बदल अशक्य; तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक: कोकाटेंची विधानपरिषदेत घोषणा

Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Onion Cultivation : खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार

SCROLL FOR NEXT