Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Alphonso Mango : हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री

Mango Market Rate : सध्या घाऊक बाजारात आंब्याच्या पेटीचा भाव एक हजार रुपयांपासून साडेतीन हजारांपर्यंत आहे. हा या हंगामातील सर्वाधिक खाली आलेला भाव आहे.

Team Agrowon

Washi News : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ आता वाशीच्या घाऊक फळ बाजारात कोकणातील हापूससह परराज्यातील इतर जातीच्या आंब्यांनीही गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

त्यात कर्नाटकच्य्या आंब्यांची आवक मोठी आहे. हे कर्नाटकचे आंबे घाऊक बाजारात आणि बाजाराबाहेरही रत्नागिरी-देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अस्सल हापूस खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

बाजारात सध्या कोकणातील हापूसच्य्या सरासरी ८० हजार पेट्या दररोज येत आहेत. सध्या घाऊक बाजारात आंब्याच्या पेटीचा भाव एक हजार रुपयांपासून साडेतीन हजारांपर्यंत आहे.

हा या हंगामातील सर्वाधिक खाली आलेला भाव आहे. दुसरीकडे, बाजारात परराज्यांतून इतर जातींचा आणि कर्नाटकमधूनही आंबा बाजारात येऊ लागला आहे.

कर्नाटकी १०० रुपये किलो

कोकणातील हापूसची चव आजपर्यंत कोणत्याच आंब्यात उतरलेली नाही. यावर्षीही बाजारात हेच चित्र आहे. कर्नाटकचा आंबा सरासरी १०० रुपये किलोने मिळतो; मात्र हापूस म्हणून तो पेटीत पॅक करून, हापूसच्या भावाने विकला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळतो. यामुळे कर्नाटकच्य्या आंब्याची हापूसच्या नावाने विक्री केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT