Nampur APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Nampur APMC : नामपूर बाजार समितीत भाजीपाला विक्रीची सोय

Team Agrowon

Nashik News : मोसम खोऱ्यातील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, त्यांच्या वाहतूक खर्चात बचत होऊन तत्काळ रोखीने पैसे मिळावेत, यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विक्री केंद्रामुळे शेतकऱ्यांची हित साधले जाईल, असे प्रतिपादन बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी केले.

येथील मुख्य बाजार समितीच्या आवारात भाजीपाला विक्री केंद्राचा प्रारंभप्रसंगी पवार बोलत होत्या. या वेळी उपसभापती युवराज पवार, संचालक संचालक विलास सावंत, पंकज भामरे, के. पी. कापडणीस, लोटन धोंडगे, किरण वाघ, संदीप निकम, सयाजी देवरे, मंगला कापडणीस, गिरीश भामरे, राकेश देवरे, आकाश भामरे, अरुण वाघ, पोपट ठाकरे, भरत मुथा, प्रशांत चौधरी, प्रशांत देवरे, अरुण अहिरे, नामपूर शहर व्यापारी असोसिएशन, आडतदार, शेतकरी, बाजार समितीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. सचिव संतोष गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

उघड लिलाव पद्धतीने भाजीपाल्याचा लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार झाला. यापूर्वी येथील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मालेगाव, जायखेडा, ताहाराबाद आदी ठिकाणी जावे लागत असे. परंतु बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.

सध्या दहापेक्षा अधिक व्यापाऱ्यांना व्यवसायाकरिता परवाने देण्यात आले आहेत. शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून बाजार समिती व शेतकऱ्यांची भरभराट होण्यासाठी संचालक मंडळाने यापूर्वी रासायनिक खत विक्री केंद्राची सुरुवात केली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भाजीपाला विक्री केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजीपाला व्यापारी असोसिएशनने केले आहे.

या वेळी भाजीपाला व्यापारी प्रभाकर अहिरे, देवा भामरे जगदीश गायकवाड अजित बोरसे नाना जगताप कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र बडजाते, उपाध्यक्ष अमित सावंत आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj : राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण; अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Rabi Season 2024 : यंदा साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीचे बुलडाण्यात नियोजन

Land Dispute : गावकऱ्यांचा डाव

Cattle Census App : तांत्रिक अडचणीत अडकलेल्या पशुगणनेची अखेर तारीख ठरली

Labor Shortage : पावसामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली

SCROLL FOR NEXT