ST Mahamandal 
ॲग्रो विशेष

ST Mahamandal : उन्हाळा सुट्ट्यांमुळे एसटीच्या जादा फेऱ्या

Summer Vacation : शाळांच्या उन्हाळा सुट्ट्या, जत्रा, यात्रा, लग्नसराई, या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. १५ जूनपर्यंत या जादा गाड्या सुरु राहणार आहेत.

Team Agrowon

Solapur News : शाळांच्या उन्हाळा सुट्ट्या, जत्रा, यात्रा, लग्नसराई, या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (ST Mahamandal) प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. १५ जूनपर्यंत या जादा गाड्या सुरु राहणार आहेत.

सोलापूर आगाराने प्रवाशांसाठी सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, वैराग, करमाळा, कुर्डुवाडी, अकलूज, सांगोला येथील स्थानकावरून राज्यातील वेगवेळ्या शहरांमध्ये या जादा गाड्या धावणार आहेत.

‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. एसटी स्थानकांवर आता दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. जादा गाड्या पूर्ण क्षमतेने धावाव्यात, यासाठी प्रवासी मित्र व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.

प्रवाशांच्या सेवेसाठी सायंकाळी सर्व कर्मचारी एसटी स्थानकावर असावेत. उन्हाळा सुट्ट्यांमुळे प्रवासी वाढत असल्याने आगार व्यवस्थापकांनी कार्यालय सोडू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.

सुटीच्या काळात जास्तीत जास्त बसगाड्या रस्त्यांवर धावतील, यादृष्टीने नियोजन करावे, अशाही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, सुरवातीला ३० टक्के थेट प्रवासी असल्यास मंजूर फेऱ्यांशिवाय जादा फेरी चालवता येईल.

तोट्यात चालणाऱ्या फेऱ्या चालवू नयेत, तोट्यात चालणाऱ्या फेऱ्यांसाठी आगार व्यवस्थापकच जबाबदार असतील, असेही वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन नियोजन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टीत ४४ जादा गाड्या

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय एसटी महामंडळाने केली आहे. त्यात सोलापूर-लातूर, पंढरपूर-लातूर, पंढरपूर-बीड, पंढरपूर-त्रंबकेश्वर, पंढरपूर-परळी, सोलापूर-सिंदखेडराजा, अक्कलकोट-त्रंबकेश्वर, करमाळा-लातूर, करमाळा-छत्रपती संभाजी नगर, अकलूज-लातूर, अकलूज-शिर्डी, मंगळवेढा-नगर, अक्कलकोट-ठाणे, वैराग-बोरिवली, सोलापूर-पुणे, पंढरपूर-ओझर, पंढरपूर-कोल्हापूर, पंढरपूर-स्वारगेट, बार्शी-स्वारगेट, अक्कलकोट-स्वारगेट, अक्कलकोट-पुणे, करमाळा-स्वारगेट, अकलूज-स्वारगेट, अकलूज-पंढरपूर स्वारगेट, सांगोला-स्वारगेट, सांगोला-पंढरपूर कोल्हापूर, वैराग-स्वारगेट, कुर्डूवाडी-स्वारगेट, मंगळवेढा-स्वारगेट अशा एकूण ४४ गाड्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT