Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : भात, नाचणी विक्रीसाठी नोंदणीस मुदतवाढ

MSP Procurement : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेले धान (भात) व नाचणी (रागी) हमीभावाने विक्री करायचा आहे.

त्या शेतकऱ्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले. फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरू आहे.

चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित दाटे, आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी-विक्री संघ मर्यादित. राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे व राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी-विक्री संघ मर्यादित राशिवडे. कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी-विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी व भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी-विक्री संघ मर्यादित गारगोटी. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे नोंदणी सुरू आहे.

भरडधान्य विक्रीसाठी नोंदणीचे आवाहन

सांगली : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रांवर भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) विक्रीकरिता अद्याप ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही, अशांनी नोंदणी करावी, असे आवाहन चंद्रकांत खाडे यांनी केले.

मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत विष्णुअण्णा सहकारी खरेदी-विक्री संघ, सांगली (सांगली व जत), कवठेमहांकाळ तालुका खरेदी-विक्री संघ, कवठेमहांकाळ, ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, तासगाव, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघ, खानापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी या ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू केली आहे.

शासनाने मका पिकासाठी २ हजार ९०, बाजरीकरिता २ हजार ५००, ज्वारीकरिता ३ हजार २२५ रुपये (मालदांडी) प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली (जत, कवठेमहांकाळ, मिरज), तासगाव, शिराळा, विटा, आटपाडी, पलूस, इस्लामपूर अथवा जिल्हा पणन अधिकारी यांच्या वसंत मार्केट यार्ड सांगली येथी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही खाडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT