Rose Export Agrowon
ॲग्रो विशेष

Rose Export : मावळ-तळेगावातून ७० लाख गुलाबांची निर्यात

Valentine's Day : या वर्षीच्या निर्यातीला साधारण ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान निर्यातीला सुरुवात झाली.

Team Agrowon

Pune News : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरातून मागणी असलेल्या भारतीय लाल गुलाबाची तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख फुलांची निर्यात झाली असून, तेवढी फुले देशांतर्गत बाजारपेठेत पाठविली असल्याची माहिती फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघाचे सचिव मल्हारराव ढोले यांनी दिली.

तर, मावळ तालुक्यातून सुमारे ३० लाख फुले निर्यात झाल्याचे मुकुंद ठाकर यांनी सांगितले. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक रुपया अधिक दर मिळाल्याचे ढोले यांनी सांगितले. या वर्षी १४ ते १५ रुपये दर मिळाला.

या वर्षीच्या निर्यातीला साधारण ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान निर्यातीला सुरुवात झाली. तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील ७०० एकरांवर पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली आहे. यामधील ४० टक्के क्षेत्रावर लाल गुलाब, तर इतर क्षेत्रावर इतर रंगाचे गुलाब, जरबेरा, कार्नेशन, रोपवाटिका आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.

या वर्षी व्हॅलेंटाइन डेसाठी फुलांची टंचाई जाणवेल असा अंदाज होता. यामुळे पहिल्या टप्प्यात निर्यातदारांकडून मागणी वाढली होती. मात्र या वर्षी हवामानाने साथ दिल्याने फुलांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याचे ढोले यांनी सांगितले.

याबाबत ढोले म्हणाले, ‘‘माझे चार एकरांवर पॉलिहाऊस असून. यापैकी दोन एकरांवर फक्त लाल गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी माझ्या पॉलिहाऊसमधून ६० हजार फुलांची निर्यात झाली आहे. तर, आणखी ५० हजार फुले स्थानिक आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी उपलब्ध आहे. या वर्षी साधारण १४ ते १५ रुपये दर मिळाला. तो गेल्या वर्षीपेक्षा एक रुपयाने जास्त आहे.’’

फ्लोरिकल्चर पार्कसह मावळ तालुक्यात सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावरील पॉलिहाऊसमधून फुलांचे उत्पादन घेतले जाते. मावळ तालुक्यातील उत्पादन आणि निर्यातीबाबत पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर म्हणाले, ‘‘या वर्षी विमानांच्या बुकिंगची दरवाढ, जीएसटी आणि आणि योग्य स्लॉट न मिळाल्याने निर्यातीला फटका बसला आहे.

गेल्या वर्षी मावळातून सुमारे ४० ते ४५ लाख फुलांची निर्यात झाली होती. या वर्षी ती केवळ २५ ते ३० लाख एवढी झाली आहे. या वर्षी १४ ते १५ रुपये दर मिळाला तोच दर गेल्या वर्षी १८ रुपयांपर्यंत होता. तर देशांतर्गत बाजारात या वर्षी ५० लाख फुलांचा पुरवठा झाला आहे. त्याला १० ते १२ रुपये दर मिळाला. एकूणच या वर्षी उत्पादन चांगले मिळाले मात्र निर्यात कमी झाली आहे.’’

ही आहे परदेशी बाजारपेठ

जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप, दुबई आदी.

देशांतर्गत बाजारपेठ

मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, सुरत आदी मोठी शहरे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT