Aslam Abdul Shanedivan
गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणात समारंभ, कार्यक्रम आणि इतर कारणांसाठी केला जातो.
गुलाबाचा वापर औषधे तयार करण्यासह कॉस्मेटिक उत्पादनांमध्येही होतो. यामुळे गुलाब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
पण लागवड करताना कलम लावण्याची योग्य पद्धत शेतकऱ्यांना माहित नसते. त्याबाबत हे थोडक्यात...
कलम लावण्याच्या अनेक पद्धती असून सध्या 'टी' कलम सर्वात यशस्वी आहे.
गुलाबाच्या १ वर्ष जुन्या झाडाची निवड करावी. त्याच्या रूटस्टॉक तळापासून ८-१० सें.मी. वर इंग्रजी 'T' प्रमाणे कापून त्यात कलम करावे. ते पॉलिटेप किंवा प्लास्टिकने बांधावे.
कलम केल्यावर सुमारे २० ते २५ दिवसांनी, कळ्या बाहेर आल्यानंतर, रूटस्टॉकचा वरचा भाग कापून टाकावा. यानंतर ४ महिन्यांत हे कलम लागवडीसाठी तयार होईल.
गुलाबांच्या जाती या २० हजारांहून अधिक आहेत. मात्र तज्ज्ञांनी यांची विभागणी मुख्य ५ श्रेणीत केली आहे. जे रंग, आकार, सुगंध आणि वापरानुसार आहेत. तर हायब्रीड टी, फ्लोरिबुंडा, पॉलिएंथा क्लास, क्रीपर क्लास आणि लघू असे त्याचे वर्ग आहेत.