DRR Paddy : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देशातील भात लागवडीचं क्षेत्र ५० लाख हेक्टरनं कमी करण्याचे स्पष्ट संकेत मागील आठवड्यात दिले आहेत. भात लागवडीखालील क्षेत्र कडधान्य आणि तेलबिया लागवडीकडे वळवण्याचा केंद्र सरकारचा त्यामागे उद्देश आहे. परंतु या निर्णयामुळे धान उत्पादन कमी होईल. तसेच कडधान्य आणि तेलबिया उत्पादनतही अपेक्षित वाढ होणार नाही, अशी भीती तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.
डाउन टू अर्थच्या रिपोर्टनुसार, भात उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षित बियाणे, आधुनिक शेतीचं प्रोत्साहन गरजेचं आहे. तसेच तेलबिया आणि कडधान्य पिकांतून आर्थिक उत्पन्नाची हमी द्यावी लागेल. शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं नाही तर मात्र तांदळाची उत्पादकता कमी होईल. तसेच बाजारातील तांदळाचे भावही वाढतील, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे जमिनीची तपासणी करूनच योग्य पीक निवड केल्यास उत्पादनात वाढ होईल, असा दावाही तज्ज्ञाकडून केला जात आहे.
केंद्र सरकारने जनुकीय संपादित तंत्रज्ञानावर आधारित दोन नवीन तांदळाचे वाण विकसित केले आहेत. यामध्ये डीआरआर धान १०० (कमला) आणि पुसा डीएसटी राइस १ हे दोन वाण आहेत.
या दोन्ही वाणांमध्ये दुष्काळात पाण्याच्या ताणासह सहनशील आणि नत्र वापरण्याची अधिक क्षमता आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या वाणांमुळे भात उत्पादनात ३० टक्के वाढ होऊ शकते, असा दावाही केला जात आहे.
केंद्र सरकारने धान लागवडीचं क्षेत्र ५० लाख हेक्टरने कमी करण्याचं ठरवलं आहे. तर त्याचवेळी धान उत्पादन १०० दशलक्ष टनांनी वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. कडधान्य आणि तेलबिया आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाताचं क्षेत्र कमी करून कडधान्य आणि तेलबिया पिकाची लागवड वाढवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे.
नुकतेच विकसित करण्यात आलेली भात पिकाचे वाण जनुकीय संपादित केलेली आहेत. यामध्ये एसडीएन१ आणि एसडीएन२ पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जैवतंत्रज्ञान सुरक्षा कायद्यापासून त्याला सूट देण्यात आलेली आहे. परंतु हे तंत्रज्ञान अद्यापही पूर्णपणे विकसित झालेली नाही, असा दावा तज्ज्ञ करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.