Nanded Zilha Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Zilha Parishad : सार्वत्रिक बदली प्रक्रियेत ११५ दिव्‍यांग कर्मचाऱ्यांना सूट

Nanded Zilha Parishad Staff : नांदेड जिल्हा परिषदेत ता. आठ ते ता. ११ मे दरम्यान जिल्‍हास्‍तरीय बदल्‍या पार पडल्‍या. या दरम्यान जिल्हा परिषदेतंर्गत विविध संवर्गातील ३७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Team Agrowon

Nanded Zilha Parishad News : नांदेड जिल्हा परिषदेत ता. आठ ते ता. ११ मे दरम्यान जिल्‍हास्‍तरीय बदल्‍या पार पडल्‍या. या दरम्यान जिल्हा परिषदेतंर्गत विविध संवर्गातील ३७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

त्यामध्ये जे कर्मचारी दिव्यांग म्हणून कार्यरत आहेत. अशा ११५ कर्मचा-यांना बदलीमधून सूट देण्यात आली आहे. यात ८७ कर्मचा-यांना प्रशासकीय बदलीत सुट तर २८ जणांना विनंती बदलीत प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

दिव्यांगांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे या नेहमी सकारात्मक भूमिका घेऊन त्यांची कामे मार्गी लावलेली आहेत.

बदली प्रक्रियेमध्ये देखील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यांनी ११५ कर्मचा-यांना सुट दिलेली आहे. त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आभार मानले असून आनंद व्‍यक्‍त केला आहे.

सदर बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख व त्यांचे अधिनस्त कर्मचा-यांनी बदली प्रक्रियेकामी सहकार्य केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT