Dr. Bhagwat Karad Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Bhagwat Karad : प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करा

Union Finance Minister Dr. Bhagwat Karad : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जशी चळवळ उभी केली तशी चळवळ भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी उभी राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जशी चळवळ उभी केली तशी चळवळ भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी उभी राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

वेरूळ येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस इतर ग्रामपातळीवरील यंत्रणाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे,

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुपे यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आक्रमक

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळात अनेक जण बाहेर जात असल्याचे पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मीना उभे राहिले. त्यांनी, हा मनोरंजन कार्यक्रम नाही प्रशिक्षण आहे. ते समजून घ्या, कारण ग्राम पातळीवर शासनाच्या योजनांची माहिती तुम्हाला नसली तर ती लोकांना कशी कळेल असा सवाल केला.

कार्यक्रम असलेल्या ठिकाणच्या खुलताबाद तालुक्यातील किती ग्रामसेवक आहेत याची विचारणा करत त्यांनी गेटवर जाऊन बाहेर जाणार आमची नोंद घ्यावी, अशी सूचना केली. प्रशिक्षण संपल्यानंतरही प्रत्येकाची हजेरी घेतली जाणार असल्याचे श्री. मीना यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT