Sugarcane Agriculture Damage agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Agriculture Damage : उसाला तुरे फुटले तरी साखर कारखाने बंदचं, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

Sugarcane Farmers : ऊस गळीत हंगाम सुरू नसल्याने उसाला तुरे फुटलेल्या उसाला तत्काळ तोडी देऊन साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाची उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Season Kolhapur : यंदा अवकाळी पावसाने तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर पडला. सध्या गळीत हंगामाला सुरुवात झाली नसली, तरी वातावरणातील सततच्या बदलाने उसाला तुरे फुटले आहेत. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गळीत हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागली आहे.

कोल्हापूर ऊस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ऊस उत्पादनात घट झाल्यास खते, बियाणे, मोलमजुरी, मशागत यांचा ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. ऑक्टोबर अखेरीस परतीच्या पावसाने धुवाधार हजेरी लावल्याने अद्याप शेतातील ओलावा कमी झालेला नाही. त्यातच अजूनही कोणत्याही कारखान्याने 'एफआरपी' जाहीर न केल्याच्या कारणांनी यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर पडला आहे.

अतिरिक्त पाऊस, ढगाळ, बदलते वातावरण, पूर यातून वाचलेल्या उसाला सध्या तुरे फुटल्याने यंदा उसाचे वजनही घटणार असल्याने याचा परिणाम होणार असून, ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. उशिरा गळीत हंगामामुळे उसाच्या वजनात होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

यंदा महापूर, हुमणी, लोकरी माव्याने नदीकाठही नुकसानग्रस्त झाला आहे. त्यातच ऊस गळीत हंगाम सुरू नसल्याने उसाला तुरे फुटलेल्या उसाला तत्काळ तोडी देऊन साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाची उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तोडणी मालक व मजूरही संकटात...

दरवर्षी ऊस तोडणीसाठी बीड, विजापूर, लातूर, सांगोला, मराठवाडा या भागातून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असते. वाहनधारक पावसाळ्यातच या मजुरांना अॅडव्हान्स म्हणून लाखो रुपये देतात. गतवर्षीही उसाला मोठ्या प्रमाणात तुरे फुटले होते आणि यंदाही बदलत्या वातावरणामुळे उसाची वाढ खुंटली आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. मजुरांनी घेतलेली अॅडव्हान्स लाखात असल्याने ती रक्कम हंगाम कालावधीत कशी फिटणार, अशा चिंतेत ऊस वाहतूक तोडणी मालक व मजूर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Vidhansabha Election : नांदेडमध्ये लोकसभेसह विधानसभेसाठी २५ वर्षांनंतर मतदान

Sugarcane Crushing : गाळपासाठी नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांना परवाना

Chhatrapati Sambhajinagar Vidhansabha Election : छत्रपती संभाजीनगर शहरात १२९०, ग्रामीणमध्ये १९८३ मतदान केंद्र

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे हरभरा दर?

Cotton Rate : दोन वेचणींतच खराटा; कापसाला कवडीमोल भाव

SCROLL FOR NEXT