eSakal.com No 1 Agrowon
ॲग्रो विशेष

eSakal No 1: 'ई-सकाळ'ची पुनश्च एकदा गगनभरारी ! २१.२ मिलियन वाचकांच्या पंसतीची मोहोर कायम

Top Marathi News Website : मराठी डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात eSakal.com ने सलग दुसऱ्या महिन्यात महाराष्ट्रातील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे. हे यश केवळ आकडेवारीचे नसून वाचकांच्या विश्वासाचे आणि सकाळ डिजिटल टीमच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतीक आहे.

Team Agrowon

मराठी डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सकाळ.कॉमने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या महिन्यात अव्वलस्थानी राहण्याची किमया साधली आहे. मे महिन्यानंतर जून २०२५ मध्येही सकाळ.कॉम ही महाराष्ट्रातील क्रमांक एकची न्यूज वेबसाईट बनली आहे.

कॉमस्कोर (Comscore) च्या ताज्या अहवालानुसार, जून २०२५ मध्ये तब्बल २१.२ दशलक्ष (मिलियन) युनिक वाचकांनी eSakal.com ला भेट दिली. त्यामुळे eSakal.com सलग दुसऱ्या महिन्यात महाराष्ट्रातील डिजिटल वेबसाईट्सच्या क्रमावारीत अव्वलस्थानी असणारे वृत्तसंकेतस्थळ बनले आहे.

या यशाने eSakal.com ने लोकमत, एबीपी माझा (ABP Majha), टीव्ही९ मराठी (TV9 Marathi) आणि लोकसत्ता यांसारख्या मराठी माध्यमातील मोठ्या ब्रँड्सना मागे टाकले असून आपल्या नावाचा डंका पुन्हा एकदा वाजविला आहे.

2025 मध्ये नव्या उमेदीने वाटचाल करण्याच्या संकल्पासह सकाळ.कॉमने भूतकाळाची कात टाकत जानेवारी, मे आणि जून महिन्यांत दिग्गज मीडिया ब्रँड्सना मागे टाकून मराठी डिजिटल पत्रकारितेच्या विश्वात आपली दावेदारी निश्चित केली आहे.

सकाळ.कॉमने मे आणि जून या दोन सलग महिन्यांत मिळवलेले हे यश केवळ आकडेवारी नसून वाचकांचा अढळ विश्वास आणि ई-सकाळ टीमची अथक मेहनत, याचीच ही पावती आहे. सातत्यपूर्ण ताज्या अपडेट्स, अचूक माहिती, विशेष वेबस्टोरीज आणि बातम्यांची वेगळी, आकर्षक मांडणी यामुळे वाचकांनी ई-सकाळवर आपल्या पसंतीची मोहोर पुन्हा उमटवली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वेबसाईटवर अनेक नव्या विभागांसह राजकारणातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि हायपरलोकल बातम्या यासारखे विविध प्रयोग करून विविध वयोगटातील वाचक eSakal.com शी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आकर्षक मांडणी, दर्जेदार कंटेंट, वेबस्टोरीज आणि इन्नोव्हेटिव्ह फॉरमॅट्समुळे वाचकांची पसंती मिळवण्यात यश आले.

या यशामागे सकाळच्या सर्व विभागांच्या टीमचं सहकार्य, एकत्रित नियोजन आणि योग्य कंटेंट स्ट्रॅटेजी (Content Strategy) आहे. प्रिंट (Print), डिजिटल (Digital), सोशल मीडिया (Social Media) आणि व्हिडिओ (Video) या सर्वच प्लॅटफॉर्म्सवर सकाळने आपली छाप उमटवली आहे. याचा परिणाम म्हणजे दररोज लाखो वाचकांचा विश्वास आणि त्यातून मिळणारे हे यश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: डाळिंबाचा रंग, आकार, दर्जा उत्तम राखण्यावर भर

Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

SCROLL FOR NEXT