Veterinary Education Agrowon
ॲग्रो विशेष

Veterinary Education : ‘पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधनातून साम्य आरोग्य संकल्पना साकारावी’

Veterinary : पशुवैद्यक क्षेत्रात संशोधनातील प्रकल्प उत्तम प्रकारे पूर्ण केल्यास जगाची एक आरोग्य म्हणजे साम्य आरोग्य संकल्पना साकारता येईल.

Anil Jadhao 

Parbhani News : पशुवैद्यक क्षेत्रात संशोधनातील प्रकल्प उत्तम प्रकारे पूर्ण केल्यास जगाची एक आरोग्य म्हणजे साम्य आरोग्य संकल्पना साकारता येईल. अनेक दुर्धर रोगावर मात करणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश दिग्रसकर यांनी केले.

पशुवैद्यक महाविद्यालयात जागतिक पशुवैद्यक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. विविधता, समानता आणि समावेशकता यांची पृष्टी पशुवर्धक क्षेत्रात करण्याच्या उद्देशाने जगात यंदाचा (२०२३) पशुवैद्यक दिन साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी आणि भविष्यातील आव्हाने यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, प्रा. डॉ. संतोष मोरेगावकर, प्रा. डॉ. चंद्रकांत मामडे, डॉ. सुहास अमृतकर, डॉ. वैजनाथ काळेयांची उपस्थिती होती.दिग्रसकर म्हणाले, की शेळ्या मेंढ्यातील पी. पी. आर. रोगाचे समूळ उच्चाटन सन २०३० पर्यंत करण्याचे आव्हान पशुवैद्यकीय क्षेत्राने स्वीकारावे.

पशुधनाकडून मानवात पसरणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधासाठी संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत. डॉ. मार्कंडेय म्हणाले, की राष्ट्रीयस्तरावर अतुलनीय कार्य करत असलेल्या पशुवैद्यकांच्या उदाहरणातून तरुण पशुवैद्यकांनी आपल्या जिद्दीने या क्षेत्रातील आपले योगदान अतुल्य घडवावे.

जागतिक पशुवैद्य दिनाच्या निमित्त डॉ. गोविंद गंगणे यांनी विद्यार्थ्यांसाठी माझी पशुवैद्यक क्षेत्रातील आवड कशासाठी या विषयावर प्रश्‍नमंजूषा आयोजित केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT