Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season Planning : कृषी विभागाने खरिपाच्या गावनिहाय बैठकीचे आयोजन करावे ः देशमुख

Seed Fertilizer Availability : बाळापूर आणि पातूर तालुक्यांमध्ये येत्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची कुठेही विक्री होऊ नये. त्याचप्रमाणे, रासायनिक खतांसोबत इतर उत्पादनांची लिंकिंगही कुठे होऊ नये.

Team Agrowon

Akola News : बाळापूर आणि पातूर तालुक्यांमध्ये येत्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची कुठेही विक्री होऊ नये. त्याचप्रमाणे, रासायनिक खतांसोबत इतर उत्पादनांची लिंकिंगही कुठे होऊ नये. या संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निवारण करावे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करण्यात कमतरता भासू देऊ नका.

तसेच गावनिहाय बैठकीचे आयोजन करावे, अशी सूचना बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली. तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. अकोला येथे आमदार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली.

उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तालुका (आत्मा) समितीचे अध्यक्ष रवींद्र पोहरे, बाळापूर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, उपविभागीय कृषी अधिकारी हरीश देशमुख, पातूर तहसीलदार राहुल वानखेडे, बाळापूर तहसीलदार वैभव फडतारे, बाळापूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी जाधव,

पातूर तालुका कृषी अधिकारी संजय अटक, बाळापूर पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी राजेश खुमकर, पातूरच्या प्रभारी गटविकास अधिकारी सुनीता इंगळे, जिल्हा संघटक सरिता वाकोडे, बबलू देशमुख, गोपाल उगले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान या प्रसंगी आमदार देशमुख यांनी बाळापूर व पातूर तालुक्यांतील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील पाच शेतकऱ्यांची निवड करून त्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत लागणाऱ्या बियाणे, खते, कीटकनाशके असा संपूर्ण खर्च आपण व आपले सहकारी उचलतील, असे जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT