Green Fodder  Agrowon
ॲग्रो विशेष

Green Fodder : चांगल आरोग्य, दूध टिकून राहण्यासाठी जनावरांना हिरवा चारा दिलाचं पाहिजे

Animal Care : जास्त उत्पादनासाठी आणि जनावरांचं चागलं आरोग्य टिकून राहण्यासाठी त्यांना दररोज हिरवा चारा देणं गरजेचे आहे. कारण जनावराच्या चांगल्या शारीरिक वाढीसाठी आणि दुध उत्पादनासाठी आवश्‍यक असणारी सर्व पोषणमूल्ये ही हिरव्या चाऱ्यापासून मिळत असतात.

Team Agrowon

Animal Feed : जास्त उत्पादनासाठी आणि जनावरांचं चागलं आरोग्य टिकून राहण्यासाठी त्यांना दररोज हिरवा चारा देणं गरजेचे आहे. कारण जनावराच्या चांगल्या शारीरिक वाढीसाठी आणि दुध उत्पादनासाठी आवश्‍यक असणारी सर्व पोषणमूल्ये ही हिरव्या चाऱ्यापासून मिळत असतात. जनावरांना सकस हिरवा चारा देण्याचे आणखी काय फायदे आहेत याविषयीची माहिती घेऊया.

जनावरांच्या समतोल आहाराच्या दृष्टीने खुराक, हिरवा चारा, वाळलेला चारा यांच योग्य प्रमाण असावं लागतं. जनावराच्या आहारात साधारणपणे ७० टक्के चाऱ्याचं प्रमाण असावं लागतं. यामध्ये चाऱ्याची हिरवा चारा आणि कोरडा चारा अशी विभागणी होते. सकस हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे ही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चांगल्या दूध उत्पादनासाठी जनावरांना दररोज हिवा चारा दिला गेला पाहिजे.

हिरव्या चाऱ्याचे फायदे काय आहेत?

हिरव्या चाऱ्यामध्ये विविध घटक हे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळे जनावरांना पचनाचा त्रास होत नाही. तसच हिरव्या चाऱ्याध्ये कॅरोटीन असल्यामुळे जनावराची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. गाभण जनावरांना जर गाभण काळातपुरेशा प्राणात हिरवा चारा दिला गेला नाही तर जन्मनारी वासरे ही अशक्त, कमजोर जन्मतात.

दुधाळ जनावरांची दुध देण्याची क्षमता ही जास्त काळ टिकवायची असेल, तर जनावरांच्या आहारात हिरवा चारा असलाच पाहिजे. कारण हिरवा चारा हा पचायला सोपा असतो. जनावराना वर्षभर हिरा चारा मिळत राहावा यासाठी ज्याकाळात हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्या काळात हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून ठेवावा. त्याचा उपयोग इतर हंगामात म्हणजेच उन्हाळ्यात देखील करता येतो. हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल वर्गीय चारा पिकांपैकी ज्वारी, बाजरी, मका, यशवंत, जयवंत, गुणवंत, दशरथ या चारा पिकांचा समावेश होतो तर द्विदल पिकामध्ये बरसीम, लसूणघास, चवळी, स्टायलो या पिकांचा समावेश होतो.

एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ४ - ७ टक्के असत, तर द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये १५ - २० टक्के प्रथिने असतात. हिरव्या चाऱ्याच्या तुलनेने वाळलेल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. जनावरांना खनिजे, प्रथिने ही हिरव्या चाऱ्यातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. हिरवा चारा हा रुचकर, पाचक, तसेच चविष्ट असल्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. त्यामुळे आपल्या पशुधनाला वर्षभर हिरवा चारा मिळत राहावा यासाठी पक्क नियोजन करणं गरजेच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT