Green Fodder : वाया जाणारा हिरवा चारा असा वाचवा?

Team Agrowon

हिरवा चारा मऊ, चवदार असण्याव्यतिरिक्त, जनावराला पचायलाही सोपा असतो. स्थानिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या हिरव्या चाराचा वापर करून पशुखाद्याची किंमत कमी करता येते. त्यामुळे जनावराला दिला जाणारा चारा रुचकर असावा.

Animal Green Fodder | Agrowon

चारा एकदम बारीक कुट्टी करून देऊ नये. कुट्टीचा आकार १ ते २ इंच राहिल्यास जनावरांचे रवंथ उत्तम होऊन चारा व्यवस्थित पचतो. त्याबरोबरच दुधातील फॅटचं प्रमाण चांगल राहण्यास मदत होते.

Animal Green Fodder | Agrowon

चारा जशास तसा लांब धाटे न देता कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा एकत्र मिसळून द्यावा. यामुळे चारा वाया न जाता चाऱ्याची पचनीयता वाढते. जनावरांना चारा खाऊ घालताना जनावराचे शरीर वजन, शरीरवाढ, बैलांची कार्यक्षमता लक्षात घेऊन चारा योग्य प्रमाणात द्यावा.

Animal Green Fodder | Agrowon

सरसकट सर्वच जनावरांना समान चारा देऊ नये. जनावरांची वर्गवारी करून चारा दिल्यास जनावरांचे आरोग्य उत्तम राहून जास्तीचे उत्पादनही मिळते. आणि चाऱ्याचा अपव्ययही टाळला जातो.

Animal Green Fodder | Agrowon

जनावरांना फक्त हिरवा चारा किंवा वाळलेला चारा न देता दोन्हींच योग्य प्रमाणात मिश्रण द्यावं. जनावरांच्या आहारात द्विदल आणि एकदल चाऱ्याचा एकत्रित वापर करावा.

Animal Green Fodder | Agrowon

व्यवस्थित गव्हाण तयार करून चारा दिल्यास सर्व चारा खाल्ला जातो. जनावरांना सतत चारा न देता दिवसातून फक्त २ ते ३ वेळा योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. यामुळे रवंथ चांगले होऊन चाऱ्याची पचनीयता वाढते.

Animal Green Fodder | Agrowon

चारा खाऊ घालण्याच्या वेळा ठराविक ठेवून त्यात अचानक बदल होणार नाही याची काळजी घ्यावी.सतत फक्त एकाच प्रकारचा चारा न देता २ ते ३ चारा पिकांचे मिश्रण द्यावे, यामुळे आवश्यक सर्व पोषणतत्त्वे मिळायची शक्यता वाढते.

Animal Green Fodder | Agrowon
आणखी पाहा