Ethanol
Ethanol Agrowon
ॲग्रो विशेष

शंभर टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्या:झुनझुनवाला

Team Agrowon

पुणेः केंद्र सरकारने शंभर टक्के इथेनॉलवर (Ethanol) चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्माचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी केली आहे. सरकार इंधन आयात (Fuel Import) आणि प्रदुषण (Pollution) कमी करण्यासाठी इथेनाॅलचा वापर वाढवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी २० टक्के इथेनाॅल मिश्रणाचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. मात्र सरकारनं इथेनाॅल वापर वाढवण्यासाठी वेगवेगळे टप्पे न करता १०० टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्यावे, अशी इस्माची भूमिका आहे.

आदित्य झुनझुनवाला यांनी नुकताच ब्राझीलचा दौरा केला. त्यांनी येथील इथेनाॅल मिश्रण आणि वापराची माहिती सरकारला दिली. ब्राझीलसारखे तंत्रज्ञान देशात लागू करावे अशी त्यांची मागणी आहे.

झुनझुनवाला यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनाॅल मिश्रण (Ethanol Blending) करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पण २० टक्के इथेनाॅल मिश्रणावर चालणाऱ्या गाड्या देशभरात विक्री होण्यासाठी ८ ते १० वर्षे लागतील. त्यामुळे सरकारचं उद्दिष्ट साध्य होईल, असं वाटत नाही.

ब्राझीलमध्ये सध्या तीन प्रकारच्या इंधनावर चालणारी वाहने आहेत. तेथील पेट्रोल पंपांवरही तीन प्रकारचे इंधन मिळते. त्यात २७ टक्के इथेनाॅलसह गॅसोलीन मिश्रीत इंधन, १०० टक्के इथेनाॅल आणि ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे दोन्हींचं मिश्रण असलेलं इंधन मिळतं.

यासोबतच २५ टक्के इथेनाॅलसह गॅसोलीन मिश्रीत इंधनही मिळते, पण त्याचं प्रमाण कमी आहे. ब्राझीलमध्ये इथेनाॅल मिश्रित इंधन आणि फक्त इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मिती व विक्री किमतीत जास्त फरक नाही. मात्र १०० टक्के इथेनाॅलची वाहने २० ते २२ किलोमीटर प्रतिलिटरचं अॅव्हरेज देतात. तसंच ब्राझीलमध्ये इथेनाॅल इंधनाचे दरही कमी आहेत, असंही झुनझुनवाला म्हणाले.

भारतात सध्या १० टक्के इथेनाॅल मिश्रण आणि २० टक्के इथेनाॅल मिश्रण असलेले इंधन पेट्रोल पंपांवर मिळते. यापैकी पेट्रोल पंपांवरील १० टक्के इथेनाॅल मिश्रण वितरण प्रणाली म्हणजेच पेट्रोल भरण्याचे मशिन्स १०० टक्के इथेनाॅल वितरणासाठी वापरता येतील. देशात दरवर्षी १० टक्के नवीन वाहनं रस्त्यावर येतात.

याचा विचार करता २० टक्के इथेनाॅल मिश्रण किंवा १०० टक्के इथेनाॅल वापर करण्यासाठी १० वर्षे लागतील. त्यामुळं देशातील २० टक्के इथेनाॅल मिश्रणावर चालणाऱ्या गाड्या निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी १०० टक्के इथेनाॅलच्या गाड्यांचा विचार करावा, असं आवाहनही झूनझूनवाला यांनी केलंय. हे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

२० टक्के इथेनाॅल मिश्रणासाठी देशाला १७०० कोटी लिटर इथेनाॅलची गरज आहे. यापैकी ८५० कोटी लिटर इथेनॉल धान्यापासून तयार केलेले तर ८५० कोटी लिटर इथेनॉल उसापासून मिळेल. सरकार दोन्ही प्रकारच्या इथेनाॅल प्लांट्सना प्रोत्साहन देत आहे. धान्य किंवा उसाची टंचाई भासल्यास उत्पादन थांबू नये, हा त्यामागचा उद्देश आहे, असंही झुनझुनवाला म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

Kharif Season : खरिपाचे क्षेत्र पावणेतीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT