Crop Harvesting Management Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Harvesting Management : पिकांच्या काढणीपश्‍चात व्यवस्थापनावर भर द्यावा

केळी आणि हळद पिकांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी बेणे निवड, काटेकोर पाणी, खते, कीड, रोग यांसह काढणीपश्‍चात व्यवस्थापनावर भर द्यावा. उत्पादन खर्च कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून उत्पादकता वाढवावी लागेल.

Team Agrowon

Hingoli News : केळी आणि हळद पिकांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी बेणे निवड, काटेकोर पाणी, खते, कीड, रोग यांसह काढणीपश्‍चात व्यवस्थापनावर भर द्यावा. उत्पादन खर्च कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून उत्पादकता वाढवावी लागेल.

शेतकऱ्यांच्या प्रगतीत ‘ॲग्रोवन’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असा सूर गिरगाव (ता. वसमत) येथे आयोजित केळी व हळद पीक व्यवस्थापन या विषयावरील ‘ॲग्रोवन संवाद’ चर्चासत्रात उमटला.

‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. १७) ‘ॲग्रोवन’ व यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तंत्राधिकारी रमेश देशमुख, यारा फर्टीलायझर्सचे विभागीय व्यवस्थापक आबासाहेब जाधव, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड, ‘अॅग्रोवन’चे व्यवस्थापक वितरण अजित वाणी, ‘सकाळ’चे सहायक व्यवस्थापक (वितरण) अनंता रेनगडे, वरिष्ठ वितरण प्रतिनिधी संतोष जवळे, ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर, माजी सरंपच बाबाराव कऱ्हाळे, प्रगतिशील शेतकरी पंडितराव नादरे, सुधाकर नादरे, मंगेश रायवाडे, मारोतराव कुंभाकर, मारोतराव केचे, शिवप्रसाद रायवाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ओळंबे म्हणाले, की केळी लागवडीसाठी प्रमाणित ऊती संवर्धित रोपाचा वापर करावा. माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्या. ठिबक संचाद्वारे पाणी आणि विद्राव्य खते द्यावीत. उन्हाळ्यात काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बागेमध्ये आच्छादन तसेच सभोवती वार प्रतिबंधक उपयायोजना कराव्यात.

देशमुख म्हणाले, की हळद लागवडीसाठी बेणे निवड अत्यंत महत्त्वाची आहे. बेण्याची साठवणूक शास्त्रोक्त पद्धतीने करावी. किड, रोगाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी बेणेप्रक्रिया करूनच हळद लागवड करावी.

जाधव म्हणाले, की शेतीमालाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी दर्जेदार खतांचा संतुलित वापर करावा. कल्याणपाड म्हणाले, की ‘ॲग्रोवन’चे विस्तार कार्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली. पिकांवर होणारा उत्पादन खर्च कमी करावा. मनरेगाअंतर्गत केळी लागवड करावी.

प्रास्ताविकात वाणी यांनी ‘ॲग्रोवन’च्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी केले. आभार ‘सकाळ ॲग्रोवन’चे वितरक प्रभाकर बारसे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: राज्यातील ४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळेल- फडणवीस

Brazil Agricultural Cooperatives: ब्राझीलमधील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल

Water Tax Collection: पाणीपट्टी वसुलीत शिरपूर तालुका अव्वल!

Fertilizer Demand: युरिया, डीएपीने वाढविली प्रशासनाची डोकेदुखी

Maharashtra Irrigation Project Success: केळझर धरणाचा ध्यास घेतलेले गोपाळराव

SCROLL FOR NEXT