Dr. Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Indra Mani : कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांना ‘एमिनेंट इंजीनियर अवार्ड’

VNMKV Parbhani : इस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) ही भारतातील अभियंत्यांची राष्ट्रीय संस्था असून जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था आहे.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांना इस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)द्वारे इमिनन्ट इंजिनिअर ॲवार्ड (प्रख्यात अभियंता पुरस्कार) छत्तीसगढ राज्याचे कृषिमंत्री राम विचार नेताम यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २९) प्रदान करण्यात आला.

रायपूर (छत्तीसगड) येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठामध्ये गुरुवार (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३०) या कालावधीत ‘कृषी अभियांत्रिकी : ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शाश्वत विकासाची वाटचाल’ या विषयावरील राष्ट्रीय कृषी अभियंता अधिवेशन आणि राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) ही भारतातील अभियंत्यांची राष्ट्रीय संस्था असून जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था आहे.या संस्थेने कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी ३० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कार्यकाळात कृषी अवशेष व्यवस्थापन, कोरडवाहू शेती, भाजीपाला यांत्रिकीकरण, लहान शेतातील यांत्रिकीकरण तसेच खत वापराची कार्यक्षमता वाढविणाऱ्या उपकरणाच्या विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार देशातील १९ पेक्षा जास्त राज्यांमध्ये झाला आहे.शेतकरी केंद्रित यांत्रिकीकरण धोरणांचे समर्थन व विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय स्तरावर कृषी ड्रोनच्या वापरासाठी प्रमाणित कार्य प्रणाली (एसओपी) विकसित करण्यासाठी समितीचे संयोजक-अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

सध्या डॉ. इंद्र मणी पिकांच्या पोषक तत्त्वांच्या ड्रोन-आधारित अनुप्रयोगांसाठी नॅनो फॉर्म्युलेशन प्रमाणित कार्यप्रणाली विकसित करण्यासाठीच्या ड्रोन समितीचे अध्यक्ष आहेत.अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT