Farmers Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Subsidy : पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार? मंत्रालयात बैठकीचे आयोजन

Farmers Loan : शेतकऱ्यांना दोन टप्प्यात पैसे देण्यात आले परंतु तिसरा टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान न मिळाले नाही.

sandeep Shirguppe

Maharashtra Farmers : राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान पात्र शेतकऱ्यांना दोन टप्प्यात पैसे देण्यात आले परंतु तिसरा टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान न मिळाले नाही. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वर्षभरापासून विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. यावर गुरुवारी( ता. १८) बैठक बोलवण्यात आली आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी शिरोळ येथील आंदोलन अंकुशच्या वतीने जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आले होते. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार मंत्री यांच्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत पुढच्या दोन दिवसांनी (ता.१८) गुरुवारी याबाबत मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली आहे. अशी माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली.

राज्य सरकारकडून २०१७, २०१८, २०१९ या तीन वर्षात नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. दरम्यान यामध्ये राज्यात सर्वात जास्त कर्ज भरणार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नियमीत कर्जाची परतफेड केली. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु हजारो शेतकरी या लाभापासून अद्यापही वंचित आहेत.

याबाबत जिल्हा बँकेच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याविषयी सहकारमंत्री यांच्या बरोबर बैठक लावून निर्णय लावण्याचे आश्वासन दिले होते. अपात्र शेतकऱ्यांना पात्र करायचे झाल्यास शासन स्तरावर आदेश होणे गरजेचे असल्यामुळे सोमवारी आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाने पुन्हा पालकमंत्री यांची जिल्हा बँकेत भेट घेतली.

यावेळी (ता.१८) मंत्रालयात सहकार मंत्री यांनी वेळ दिली असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी धनाजी चुडमुंगे यांना सांगितलं. बैठकीसाठी गुरुवारी मुंबईत येण्यास सांगितले आहे. बैठकीत तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या कागलमधील घरासमोर आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT