Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : उष्णतेने पुणे जिल्ह्यातील अकरा धरणे कोरडी

Water Scarcity : वाढत्या उष्णतेने लाहीलाही होत असताना पुणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत.

Team Agrowon

Pune News : वाढत्या उष्णतेने लाहीलाही होत असताना पुणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. याशिवाय अकरा धरणे कोरडी पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याने टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसून येते.

उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने धरणांतील पाण्याची मागणी वेगाने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून एप्रिल महिन्याच्या मध्यांवर जवळपास निम्मी धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणांत अवघा २० टक्के म्हणजेच ४१.१६ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिने पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे. धरणातील पाण्याची मागणी वाढणार असून पाणीपातळी आणखी खोल जाणार आहे.

जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या महिन्यापासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे.

गेल्यावर्षी याच काळात या धरणांत एकूण ६६.५९ टीएमसी म्हणजेच ३३ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाणीसाठ्यात जवळपास १३ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते. तर टेमघर, कासारसाई, वडीवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडली असून यामध्ये मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नाझरे धरणांत मृत साठाही संपुष्टात आला आहे.

पाण्याची मागणी वाढली

उन्हाळी हंगामामुळे शेतकऱ्याकडून मागणी वाढली आहे. यामुळे खडकवासला, चासकमान, वीर, डिंभे, घोड या धरणांतून डाव्या आणि उजव्या अशा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील चार धरणांत अवघा १०.३६ टीएमसी म्हणजेच ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये १२.६९ टीएमसी म्हणजेच २६ टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये ६.८८ टीएमसी म्हणजेच १९ टक्के पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Management: पाण्याबरोबर मातीचाही ताळेबंद महत्त्वाचा...

Agricultural Technology: कृषी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरविद्याशाखीय गटकार्याची गरज

Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय

Jackfruit Farming: संत्रा पट्ट्यात फणसाचा प्रयोग

Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची!

SCROLL FOR NEXT